अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी मोठी अपडेट समोर!

महत्वाच्या बातम्या


मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच ऑफर केल्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

अमृता फडणवीसांना लाच ऑफर केल्याप्रकरणी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला याआधीच अटक करण्यात आली आहे. आता अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आलीये.

अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांच्याशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडे माझे वडील अनिल जयसिंघानी यांना सोडवा अशी मागणी अनिक्षाने केली. त्यासाठी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला.

ही अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. एवढंच नाही तर अनिक्षाने व्हिडीओ आणि फोटो दाखवून अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला.

ही सगळी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी विधासभेत दिली होती. ज्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *