‘अनेकदा चुका, उद्धटपणा केला, पण तिने सांभाळून घेतलं…’, शाहरुख खानच्या आयुष्यात तिचं स्थान म्हणजे… – shahrukh khan relation with wife gauri khan

मनोरंजन


शाहरुख खान याच्या आयुष्यात ‘या’ महिलेचं असणं म्हणजे…, तिच्याबद्दल किंग खान याने सांगितल्या अनेक गोष्टी… तिने प्रत्येक ठिकाणी अभिनेत्याला सांभाळून आणि समजून घेतलं..

मुंबई : अभिनेता शाहरुख खान कायम कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेत्याचं खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतं. शाहरुखने आज स्वतःची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान भक्कम केलं आहे. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेला शाहरुख कुटुंबाला देखील तितकच महत्त्व आणि वेळ देतो. किंग खान आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत दिसतो. शिवाय त्याचे पत्नी आणि मुलांसोबत फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता एका महिलेबद्दल बोलताना दिसत आहे.

शाहरुख खान ज्या महिलेबद्दल बोलत आहे, ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्याची पत्नी गौरी खान आहे. आज प्रत्येकाला गौरी आणि शाहरुखच्या लव्हस्टोरीबद्दल माहिती आहे. शाहरुख कोणत्याही कार्यक्रमात गौरीबद्दल अनेक गोष्टी सांगत असतो. ज्यामुळे वारंवार शाहरुख आणि गौरी यांच्यामध्ये असलेलं प्रेम चाहत्यांनी दिसून येतं.

Gauri Khan

हे सुद्धा वाचा



आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गौरीने अभिनेत्याला प्रत्येक वेळी कसं सांभाळलं यावर खुद्द शाहरुखने मोठा खुलासा केला आहे. अभिनेता म्हणाला, ‘मला असं वाटत आहे की गौरीने मला प्रचंड सांभाळलं. मी खूप चुका केल्या, उद्धटपणा, गैरवर्तन केलं. पण तिने मला अनेक ठिकाणी शांत केलं. मी अनेकदा गैरवर्तन केलं. योग्य निर्णय घेतले नाही, अशा वेळी गौरीने शांत राहून माझी साथ दिली.’ असं म्हणत शाहरुख याने त्याच्या आयुष्यात गौरीचं असलेलं महत्त्व सर्वांसमोर सांगितलं.

सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या सर्वात क्यूट लव्हस्टोरी पैकी एक म्हणजे गौरी आणि शाहरुख यांची लव्हस्टोरी. गौरी आणि शाहरुख यांनी २५ ऑक्टोबर १९९१ साली लग्न केलं. दोघे एकमेंकांसोबत प्रचंड सुंदर दिसतात. अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसतात.

शाहरुख खान पत्नी गौरी हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे कायम चर्चेत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेता ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. चार वर्षांपूर्वी शाहरुख २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. चार वर्षांनंतर अभिनेत्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्याने ‘पठाण’ सिनेमाचं प्रमोशन देखील केलेलं नाही. पण ट्विटरवर #askSRK सेशनच्या माध्यमातून अभिनेता थेट चाहत्यांच्या संपर्कात होता.

‘पठाण’ सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी जगभरात नवीन विक्रम रचले. २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी मजल मारली. फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमाने नवे विक्रम रचत वेगळी ओळख निर्माण केली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *