Virat Kohali याच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार ‘हा’ अभिनेता? – ram charan will plya role of virat kohli in his biopic

मनोरंजन


क्रिकेटपटू विराट कोहली याच्या बायोपिकमध्ये तुम्हाला कोणत्या अभिनेत्याला पहायला आवडेल? ‘हा’ अभिनेता झळकेल विराटच्या भूमिकेत? सर्वत्र विराट कोहली याच्या बायोपिकची चर्चा…

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू विराट कोहली याने आतापर्यंत अनेक विक्रम रचले आहेत. फक्त भारतातच नाही तर पदेशात देखील सर्वत्र विराटच्या नावाची आणि त्याच्या कामाची चर्चा असते. तर आता विराट याच्या बायोपिकच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. त्यामुळे विराट याच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत झळकेल? ही चर्चा सुरु असताना एका प्रसिद्ध अभिनेत्याने विराट कोहली याच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत झळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विराटच्या भूमिकेत झळकण्यासाठी इच्छुक असलेला अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता राम चरण आहे. सध्या सर्वत्र राम चरण आणि विराट कोहली याच्या नावाची चर्चा आहे.

साउथ स्टार रामचरण याने नुकताच ‘नाटू नाटू’ गाण्यावर अनेक खुलासे केले आहे. आता अभिनेत्याने ऑस्कर २०२३ मध्ये ज्यूनियर एनटीआर आणि त्याने का नाटू नाटू गाण्यावर डान्स केला नाही? आणि विराट कोहली याच्या बायोपिकवर देखील अनेक खुलासे केले आहेत. यंदाच्या ऑस्करमध्ये नाटू नाटू गाण्याचा बोलबाला पाहायला मिळाला.

नाटू नाटू गाण्याने ऑस्कर मिळवला आहे. नाटू नाटू गाण्याची कोरिओग्राफी रक्षित द्वारा यांनी केली असून काल भैरवा आणि सिप्लिगुंज यांनी गाण्याला आवाज दिला आहे. नाटू नाटू गाण्याचे संगीतकार एमएम कीरावाना आहेत. ऑस्कर जिंकल्यानंतर एका कार्यक्रमात राम चरण उपस्थित राहिला होता. कार्यक्रमात अभिनेत्याला विचारलं की, ‘ऑस्करमध्ये नाटू नाटू गाण्यावर तुम्ही स्वतः डान्स का केला नाही?’

यावर अभिनेता म्हणाला, ‘मला स्वतःला डान्स करण्याची इच्छा होती. पण ऑस्कर कमिटीने संपर्क साधला नव्हता.. पण ऑस्करच्या मंचावर नाटू नाटू गाण्याला बोलबाला पहायला मिळाला…’ पुढे अभिनेत्याला विचारलं की, विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये झळकायला आवडेल का? यावर अभिनेत्याने क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. त्यामुळे विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता झळकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RRR सिनेमातील नाटू नाटू गाण्याने जगभरात प्रत्येकाला वेड लावलं आहे. जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू मंचावर सादर करण्यात आलं तेव्हा त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सांगायचं झालं तर, दिग्दर्शक एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने मोठी कमाई केली. फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमाने नवीन विक्रम रचला. रिपोर्टनुसार, ‘आरआरआर’ सिनेमाला यश मिळाल्यानंतर एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’ सिनेमाच्या सिक्वलवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *