Video | कच्चा बादाम गर्लसोबत धमाकेदार डान्स करताना दिसला शिव ठाकरे, व्हिडीओ व्हायरल – Videos of Shiv Thakare’s party in Mumbai went viral on social media

मनोरंजन


बिग बॉस 16 मधील स्पर्धेक पार्टी करताना दिसत आहे. आता बिग बॉस 16 च्या फिनालेला बरेच दिवस झाले असून अजूनही धमाका सुरूच आहे. नुकताच शिव ठाकरे याने बिग बाॅस 16 मधील सदस्यांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. आता या पार्टीतील काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

मुंबई : बिग बॉस 16 चा फिनाले होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र अजूनही बिग बॉस 16 (Bigg boss 16) च्या घरातील सदस्य हे सतत पार्टी करताना दिसत आहेत. सर्वात अगोदर सलमान खान याने बिग बॉस 16 च्या घरातील सदस्यांसाठी खास पार्टीचे आयोजन केले. त्यानंतर फराह खान हिने बिग बॉस 16 च्या सदस्यांसाठी पार्टी ठेवली. त्यानंतर शेखर सुमन, अब्दू रोजिक अशा बऱ्याच लोकांनी पार्टीचे आयोजन केले. आता नुकताच बिग बॉस 16 चा रनर-अप शिव ठाकरे (Shiv Thakare) याची पार्टी मुंबईमध्ये पार पडलीय. आता शिव ठाकरे याच्या पार्टीमधील काही खास व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

शिव ठाकरे याच्या पार्टीला साजिद खान, अब्दू रोजिक, सुंबुल ताैकीर, शेखर सुमन अशा बऱ्याच जणांनी हजेरी लावली. शिव ठाकरे याच्या पार्टीमध्ये फक्त एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे याची सर्वात चांगली मैत्री निम्रत काैर ही दिसली नाही. एमसी स्टॅन हा सध्या भारत दाैऱ्यावर असल्याने शिव ठाकरे याच्या पार्टीला येऊ शकला नाही.

फक्त बिग बॉस 16 मधील सदस्येच नाही तर इतरही अनेकजण या पार्टीमध्ये उपस्थित होते. कच्चा बदाम गाण्यावर साैंदर्या शर्मा, शिव ठाकरे आणि अंजली अरोडा खास डान्स करताना दिसले. आता पार्टीतील अनेक डान्सचे खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनाही या पार्टीतील शिव ठाकरे याचा लूक आवडला आहे.

एका व्हिडीओमध्ये शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक हे खास डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शिव ठाकरे हा अब्दू रोजिक याच्यासोबत गुडघ्यावर बसून डान्स करतोय. चाहत्यांना हा खास शिव आणि अब्दूचा डान्सचा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. काही दिवसांपूर्वी बोलताना अब्दू रोजिक म्हणाला होता की, आता मंडली राहिली नाहीये.

अब्दू रोजिक याचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. बऱ्याच चाहत्यांना वाटले की, मंडली तुटली आहे. नुकताच शिव ठाकरे याच्या पार्टीमध्ये जाताना अब्दू रोजिक याने मंडली असल्याचे म्हटले होते. अब्दू रोजिक याचे हे बोलणे ऐकून परत एकदा चाहत्यांना आनंद झालाय. बिग बाॅसच्या घरात शिव ठाकरे, अब्दू रोजिक, साजिद खान, एमसी स्टॅन, सुंबुल ताैकीर आणि निम्रत काैर यांच्यामध्ये खास मैत्री ही बघायला मिळाली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *