Star Pravah Parivar Awards 2023 | या कलाकारांनी पटकावला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023, वाचा संपूर्ण यादी – These actors received Star Pravah Parivar Award 2023, Read the full list

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 19, 2023 | 11:05 PM

नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा 2023 पार पडलाय. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांना त्यांच्या जबरदस्त अभिनयासाठी पुरस्कार देण्यात आलाय. आता या पुरस्कार सोहळ्यातील काही खास फोटो पुढे आले आहेत.

Mar 19, 2023 | 11:05 PM

वर्षभर ज्या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षक आणि कलाकार आतुरतेने वाट पहात असतात तो स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२३ नुकताच थाटात पार पडला. पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे तिसरं वर्ष. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण अश्या या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांना स्टार प्रवाहचा विशेष सन्मान देण्यात आला.

डोळे दिपावणाऱ्या या रंगारंग सोहळ्यात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ठरली सर्वोत्कृष्ट मालिका. तर सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार पटकावला ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पूने.

मुरांबा मालिकेतील अक्षय ठरला सर्वोत्कृष्ट पती, तर सर्वोत्कृष्ट पत्नी ठरली अबोली. अरुंधतीला मिळाला सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेचा पुरस्कार. तर संजना ठरली सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस आणि स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार.

Star Pravah Parivar Awards 2023 | या कलाकारांनी पटकावला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023, वाचा संपूर्ण यादी
आपल्या खुमासदार सूत्रसंचलनाने संपूर्ण महाराष्ट्रात धिंगाणा घालणाऱ्या सिद्धार्थ जाधवला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट सासू या पुरस्काराची मानकरी ठरली सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील नंदिनी शिर्केपाटील.

सर्वोत्कृष्ट खलनायिका हा पुरस्कार रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता आणि तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मोनिकाला विभागून देण्यात आला. सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस मेल या पुरस्काराचा मानकरी ठरला ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन. तर सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य ठरले ठरलं तर मग मालिकेतील सायली आणि शुभविवाह मालिकेतील आकाश.

‘स्वाभिमान’ मालिकेतील शांतून आणि पल्लवीला मिळाला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार. तर सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी ठरली लग्नाची बेडी मालिकेतील राघव-सिंधू. सहकुटुंब सहपरिवारचा मोरे परिवार ठरला सर्वोत्कृष्ट परिवार तर ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील दुर्गा आत्या, विनायक, विठ्ठल आणि विकास यांना सर्वोत्कृष्ट भावंडं म्हणून गौरवण्यात आलं.

प्रवाहचा फटाका हा विशेष पुरस्कार पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकीला देण्यात आला. स्टार प्रवाहकडून कलाकारांसोबतच तंत्रज्ञ मंडळींचाही विशेष सन्मान करण्यात येतो. दिग्दर्शक आणि लेखकांना सन्मानित केल्यानंतर यंदा मालिकांच्या २० छायाचित्रकारांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

स्टार प्रवाह परिवार पुरस्कारासाठी श्रीरंग गोडबोले, मंगल केंकरे, भरत जाधव, वैजयंती आपटे, मिलिंद इंगळे यांनी परिक्षणाची धुरा सांभाळली. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरला.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *