अनन्याची बहीण अलाना ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यावर तिने दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचा होणारा पती आयव्हर मॅक्रे हा दिग्दर्शक आहे.

Shah Rukh Khan and Gauri Khan
Image Credit source: Instagram
मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे हिचा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला. बॉयफ्रेंड आयव्हर मॅक्रेशी तिने लग्नगाठ बांधली. 16 मार्च रोजी पार पडलेल्या या लग्नाला बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अलानाच्या रिसेप्शन पार्टीतील काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण अलानाच्या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरुख खानने पत्नी गौरीसोबत ठेका धरला आहे. शाहरुख आणि गौरीच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.