Sara Ali Khan हिच्या पोस्टवर नेटकरी म्हणाले, ‘शुभमनसोबत कोणतीही अडचण होणार नाही…’ – Sara Ali Khan tested panjabi food users said no problem with shubman gill

मनोरंजन


सारा अली खान – शुभमन गिल यांच्या नावाची पुन्हा रंगली चर्चा; अभिनेत्रीने आता असं काय केलं, ज्यामुळे पुन्हा सुरू झाली सारा आणि शुभमन गिल यांच्या नावाची चर्चा.. साराची पोस्ट पाहून तुम्हीही म्हणाल…

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम आणि वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत साराचं नाव अव्वल स्थानी आहे. सारा फक्त तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत नसते, तर अभिनेत्रीचा स्वभाव देखील चाहत्यांना प्रचंड आवडतो. सारा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. एवढंच नाही तर, सारा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून सारा आणि भारतीय क्रिकेटर शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

सारा आणि शुभमन यांच्या नात्याची चर्चा सुरु असताना अभिनेत्रीचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यानंतर पुन्हा सारा आणि शुभमन यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. व्हिडीओ साराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. सध्या साराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये सारा एका रिक्षातून प्रवास करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे सारा स्वतः व्हिडीओ तयार करत आहे. सारा पंजाब याठिकाणी फिरताना दिसत आहे. सारा रिक्षा चालकाला विचारते आपण कुठे आहोत, यावर रिक्षा चालक म्हणतो पंजाबमध्ये… सध्या सर्वत्र साराच्या व्हिडीओची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचापुढे सारा एका ढाब्यावर थांबते. ढाब्यावर सारा पंजाबमध्ये प्रसिद्ध असलेले पदार्थ खाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सारा प्रत्येक पदार्थबद्दल सांगताना दिसत आहे. साराला नवीन लोकांना भेटायला आणि नवीन पदर्थांची चव चाखलया प्रचंड आवडतं. ती कायम असे व्हिडीओ पोस्ट करत असते.

अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेक जण कमेंट करत आहेत. एवढंच नाही तर, अनेकांनी साराचं नाव शुभमनसोबत देखील जोडलं आहे. एक नेटकरी साराच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘चांगलं आहे… आताच सवय करुन घेत आहे.. म्हणजे पुढे शुभमनसोबत कोणतीही अडचण होणार नाही…’ अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘रिक्षा चालक रिक्षा फरारीपेक्षा अधिक वेगात चालवत आहे..’ अनेकांनी साराच्या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ‘दिल दिया गल्ला’ या पंजाबी चॅट शोमध्ये शुभमनने डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं होतं. साराचं नाव घेतल्यानंतर त्याला डेटिंगविषयी पुढचा प्रश्न विचारण्यात आला. तू सारा अली खानला डेट करतोयस का, असं शुभमनला विचारण्यात आलं होतं. त्यावर तो म्हणाला, “कदाचित”. ‘सारा का सारा सच बोलो’, असं सूत्रसंचालकाने म्हटल्यावर शुभमनच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. “सारा दा सारा सच बोल दिया.. कदाचित हो, कदाचित नाही”, असं त्याने पुढे सांगितलं.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सारा आणि शुभमनच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं. पण आद्याप सारा आणि शुभमन यांनी देखील त्यांच्या नात्याचं सत्य चाहत्यांना सांगितलेलं नाही. सारा आणि शुभमन त्यांच्या नात्याचा कधी स्वीकार करतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *