Salman Khan : सलमान खान याला आणखीन एक धमकी, तुम्ही विचारही करू शकणार नाही अशा पद्धतीचा केलाय वापर! – Bollywood star salman khan recieved threating email lawrence bishnoi goldie brar marathi crime news

मनोरंजन


बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभिनेता सलमान खान याला आणखी एक जीवे मारण्याची धमकी आली आहे. याआधी गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीमध्ये दिलेल्या धमकीनंतर सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला आणखी एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. याआधी गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीमध्ये दिलेल्या धमकीनंतर सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लॉरेन्सने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे परत एकदा सलमानच्या सुरक्षेवरून आता चर्चा सुरू झाली आहे. सलमानला धमकी देण्यात आल्याच्या वृत्ताबाबत एएनआयने मााहिती दिली आहे.

सलमानला फोन वगरे नाही तर त्याला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. या संदर्भात वांद्रे पोलिसांनी आयपीसीच्या कलम 506(2), 120(बी) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि घराबाहेर सुरक्षा देखील वाढवली आहे. पोलिसांनी सलमान खानच्या ऑफिसला ईमेल पाठवल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गँगस्टर्सविरोधात गुन्हा दाखल केला होता.

ईमेलमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

गोल्डी भाईला तुझ्या बॉस सलमान खानशी बोलायचं आहे, सलमानने लॉरेन्सची मुलाखत पाहिली असेल आणि जर त्याने ती पाहिली नसेल तर ती पाहा. हे प्रकरण संपवण्यासाठी गोल्डीला सलमान खानला भेटायचे आहे, आता वेळ आहे तर त्याला इन्फॉर्म कर कारण पुढच्या वेळी मोठा झटका देऊ, असं मेलमध्ये म्हटलं आहे. rohitgarg<rg6338615@gmail.com> या ई-मेल आयडीवरून मेल पाठवण्यात आला आहे. यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

लॉरेन्स बिश्नोईने मुलाखतीमध्ये काय म्हटलं होतं?

जेलमध्ये असलेल्या लॉरेन्सने, माझ्या एरियामध्ये कोणत्याही प्राण्याची हत्या होत नाही ना तो झाडे तोडली जात नाहीत. मात्र सलमानने या ठिकाणी शिकार केली होती त्यामुळे त्याने माझी येऊन माफी मागावी, जर त्याने असं केलं नाहीतर लवकरच त्याचा अहंकार मोडून काढू, असं लॉरेन्स बिश्नोईने म्हटलं होतं.

दरम्यना, या धमकीच्या मेलमुळे सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. याआधी जून 2022 लासुद्धा सलीन खान यांच्याकडे चिठ्ठी देऊन त्यात धमकी देण्यात आली होती. पोलीस या प्रकणाचा तपास करत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *