Kiara – Sidharth यांचं वैवाहिक आयुष्य कसं सुरु आहे? अभिनेत्रीकडून मोठा खुलासा – kiara advani breaks silence on married life with husband and actor sidharth malhotra

मनोरंजन


अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर किआरा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी केलं लग्न… आता असं आहे दोघांचा वैवाहिक आयुष्य? खुद्द अभिनेत्रीने केला मोठा खुलासा…

मुंबई : अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांनी ७ फेब्रुवारी रोजी शाही थाटात लग्न केलं. लग्नानंतर अनेक ठिकाणी दोघे एकत्र देखील दिसले. शिवाय अनेक कार्यक्रमांमध्ये सिद्धार्थने किआराचा पत्नी म्हणून उल्लेख केला, तर किआराने सिद्धार्थचा पती म्हणून उल्लेख केला. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर देखील एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत सिद्धार्थ – किआरा एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त केलं. नुकताच किआराला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. याचदरम्यान पापापाझींनी किआराला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचा साधा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

व्हिडीओमध्ये किआरा अडवाणी पापाराझींसोबत गप्पा मारताना दिसत आहे. अभिनेत्री एअरपोर्ट लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये किआरा ग्लॅमरस दिसत आहे. किआरा पाहिल्यानंतर पापाराझींनी विचारलं कशी आहेस.. यावर अभिनेत्री म्हणाली मस्त आहे…

हे सुद्धा वाचापुढे पापापाझींनी किआराला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारलं. तेव्हा अभिनेत्री म्हणाली, ‘सर्व काही ठिक सुरु आहे…’ सध्या सर्वत्र किआराच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. किआरा यांच्या जोडीला रिल आणि रिअल लाईफमध्ये चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळालं. दोघांचे फॅन पेजवर देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं कधीही समोर आलं नाही. पण जेव्हा ‘शेरशाह’ सिनेमातून दोघे प्रेक्षकांच्या भोटीस आले, तेव्हा चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘शेरशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चहत्यांना प्रचंड आवडली.

किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या. अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींनी देखील दोघांचे फोटो पोस्ट करत किआरा – सिद्धार्थ यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री प्रचंड सुंदर दिसत होते. इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत किआरा हिने कॅप्शनमध्ये, ‘आता आमची कायमची बुकिंग झाली आहे…’ असं लिहिलं.

sidharth malhotra

 

सिद्धार्थ – किआरा यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘सत्य प्रेम की कथा’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तर दुसरीकडे सिद्धार्थ रोहित शेट्टी याच्या ‘कॉप-सीरिज इंडियन पोलीस फोर्स ‘ लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सिद्धार्थ याच्यासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता विवेक ओबेरॉय देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *