Kapil Sharma | कपिल शर्मा याने घेतला मोठा निर्णय, ज्विगाटो चित्रपटाचे निर्माते देणार मोठे गिफ्ट – Kapil Sharma took a big decision after the release of Zwigato movie

मनोरंजन


कपिल शर्मा याच्या ज्विगाटो या चित्रपटाला चाहत्यांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कपिल शर्मा याने आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल देखील सांगितले आहे. काही वर्षांपूर्वी कपिल शर्मा हा डिप्रेशनमध्ये गेलो होता, हे स्वत: कपिल शर्मा याने सांगितले आहे.

मुंबई : काॅमेडीचा किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ज्विगाटो या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच कपिल शर्मा याचा ज्विगाटो या चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाने चांगली कमाई करण्यास सुरूवात केलीये. मात्र, कपिल शर्मा याच्या चित्रपटासोबतच राणी मुखर्जी हिचा देखील चित्रपट (Movie) रिलीज झालाय. दुसरीकडे रणबीर कपूर याचाही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर तूफान कमाई करताना दिसत आहे. यामुळे बऱ्यापैकी फटका हा कपिल शर्मा याच्या ज्विगाटो या चित्रपटाला बसल्याचे कळत आहे. मात्र, पुढील काही दिवसांमध्ये चित्रपट चांगले बाॅक्स आॅफिस (Box office) कलेक्शन करेल असा अंदाज आहे.

ज्विगाटो चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कपिल शर्मा हा दिसला आहे. ज्विगाटो चित्रपटात कपिल शर्मा हा एका डिलीवरी बाॅयच्या भूमिकेत आहे. चित्रपटाची संपूर्ण स्टोरी ही डिलीवरी बाॅयच्या आसपास फिरताना दिसत आहे. डिलीवरी बाॅयला काम करताना नेमक्या काय समस्या येतात हे चित्रपटात दाखवण्यात आलंय.

विशेष म्हणजे ज्विगाटो चित्रपटासाठी कपिल शर्मा याचे काैतुकही केले जात आहे. ज्विगाटो चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता डिलीवरी पार्टनर्सला मोठे गिफ्ट दिले आहे. चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्यासाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले आहे. विशेष म्हणजे स्पेशल स्क्रीनिंगला स्वत: कपिल शर्मा हा उपस्थित राहणार आहे.

कपिल शर्मा याने काॅमेडीसोबतच बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले आहे. विशेष म्हणजे कपिल शर्मा याचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटाला चाहत्यांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कपिल शर्मा याने आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल देखील सांगितले आहे. काही वर्षांपूर्वी कपिल शर्मा हा डिप्रेशनमध्ये गेला होता.

डिप्रेशनमध्ये असताना आपल्यासोबत नेमके काय घडते होते, हे सांगताना कपिल शर्मा हा दिसला. कपिल शर्मा म्हणाला की, त्यावेळी मला काहीच कळत नव्हते. शोमध्ये एखादा मोठा कलाकार हा त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार असेल तर तीन चार तास अगोदर शूटिंगला सुरूवात व्हायची.

शाहरूख खान हा त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शोमध्ये येणार होता. कपिल शर्मा म्हणाला की मी अगोदरच शूटिंग सुरू केले. मात्र, शाहरूख खान येण्याच्या वीस मिनिटे अगोदर मी सेटवरून पळून गेलो. त्यानंतर शूटिंग रद्द करण्यात आली. थोड्या दिवसांनी शाहरूख खानने त्याच्या गाडीमध्ये बसून काही गोष्टी समजून सांगत थेट काही मोठे प्रश्नही विचारले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *