कंगनाचा जन्म हिमाचल प्रदेशमधील भांबला याठिकाणी झाला. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गँगस्टर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kangana Ranaut
Image Credit source: Instagram
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत तिच्या दमदार अभिनयासोबतच बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. आता कंगना पुन्हा एकदा एका पोस्टमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. यामागचं कारण म्हणजे तिच्या मुंबईतील घराबाहेर लावलेला एक साइन बोर्ड. कंगनाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ तिच्या मुंबईतील घराबाहेरचा असल्याचा म्हटलं जातंय. यामध्ये घराबाहेर एक साइन बोर्ड पहायला मिळतोय. या साइन बोर्डवरील मजकूराने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे.