चक्क हा अभिनेता कपिल शर्मा याला म्हणाला डी ग्रेड कलाकार, जाणून घ्या हा टॅग नेमका दिला कोणी? – This actor made a big statement about Kapil Sharma

मनोरंजन


काॅमेडीचा किंग बाॅलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसत आहे. नुकताच कपिल शर्मा याचा चित्रपट रिलीज झालाय. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा हा त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी कपिल शर्मा याचे काैतुक केल जात आहे.

मुंबई : कपिल शर्मा हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ज्विगाटो (Zwigato) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कपिल शर्मा याचा हा चित्रपट 17 मार्च रोजी रिलीज झालाय. कपिल शर्मा आणि राणी मुखर्जी यांचे चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले आहेत. कपिल शर्मा (Kapil Sharma) याने यापूर्वीही अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. आता काॅमेडीनंतर कपिल शर्मा याने आपला मोर्चा हा बाॅलिवूड चित्रपटांकडे वळवला आहे. विशेष म्हणजे द कपिल शर्मा शोमध्ये अनेक बाॅलिवूड (Bollywood) स्टार चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येतात. आता कपिल शर्मा हा त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी दुसऱ्या शोमध्ये जाताना दिसत आहे.

ज्विगाटो चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कपिल शर्मा याने काही धक्कादायक खुलासे काही दिवसांपूर्वी केले होते. डिप्रेशनचा काळ आपल्यासाठी किती जास्त खतरनाक होता हे सांगताना कपिल शर्मा हा दिसला. यावेळी आपल्यासोबत नेमके काय घडत होते हे देखील कपिल शर्मा याने सांगितले.

कपिल शर्मा याचा ज्विगाटो हा चित्रपट डिलीवरी बॉयच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात कपिल शर्मा हा डिलीवरी बॉयच्या भूमिकेत आहे. हा सर्व चित्रपट डिलीवरी बॉयच्या स्टोरी भोवती फिरतो. यामध्ये दाखवण्यात आले आहे की, किती मेहनतीने डिलीवरी बॉय कशाप्रकारे आॅडर या वेळेत पोहचवतात.

आता नुकताच केआरके याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कपिल शर्मा याची खिल्ली उडवली आहे. केआरके याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनेक लोक मला कपिल शर्मा याच्या शर्म करो या चित्रपटाला रिव्ह्यू देण्याची मागणी करत आहेत. पण मी त्या चित्रपटाला रिव्ह्यू देऊ शकत नाही.

पुढे केआरके म्हणाला की, खरोखरच मला याबद्दल वाईट वाटत आहे. कारण मी डी-ग्रेड कलाकारांच्या सी-ग्रेड चित्रपटांची समीक्षा करत नाही. आता केआरके याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. म्हणजेच केआरके याने थेट कपिल शर्मा याला डी-ग्रेड कलाकार म्हटले आहे.

ज्विगाटो चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कपिल शर्मा हा दिसला. यावेळी डिप्रेशनमध्ये असताना काय घडते होते हे सांगताना कपिल शर्मा हा दिसला. कपिल शर्मा हा डिप्रेशनमध्ये असताना सतत दारू प्यायचा. इतकेच नाहीतर या काळात तो दारू पिऊनच चक्क अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *