Onion Subsidy | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कांद्याच्या अनुदानात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमुक्तीचा लाभ

कृषी


Onion Subsidy | शेतकरी आपल्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास मोठ मोठी आंदोलने करतात, मोर्चे काढतात. राज्य सरकार सेवा केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करेपर्यंत शेतकरी (Onion Subsidy) आंदोलने करतात. अशाच मागण्यासाठी नाशिकहून मुंबईकडे लॉंग मोर्चा निघाला. शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या. त्याचवेळी कांद्याच्या अनुदानात (Onion Subsidy) वाढ करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

कांद्याच्या अनुदानात वाढ
त्याचवेळी विशिष्ट मंडळाकडून शेतकऱ्यांसाठी कांद्याच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी करण्यात आली. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कांद्याच्या अनुदानात प्रतिक्विंटल 50 रुपयांची वाढ केली. आता शेतकऱ्यांना कांद्यासाठी प्रतिक्विंटल 350 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. याबाबतचा निर्णय विधानसभेत घेण्यात आला आहे.

वंचितांना मिळणार कर्जमुक्तीची लाभ
आता जे शेतकरी महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या लाभातून वंचित राहिले आहेत. त्या शेतकऱ्यांना आता कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आहे. त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

…अन्यथा आंदोलन राहणार सुरू
शेतकरी जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण करणार नाहीत, तोपर्यंत शांत बसणार नाहीत. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाहीत जोपर्यंत प्रत्यक्षात याची अंमबजावणी होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. असा थेट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big news for farmers! Increase in onion subsidy by Rs


आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *