Nawazuddin Sidiqqui याच्यावर गंभीर अरोप करणारी पहिली पत्नी ‘या’ प्रकरणामुळे मोठ्या अडचणीत… – Nawazuddin Siddiqui ex wife aaliya Siddiqui in trouble

मनोरंजन


Nawazuddin Sidiqqui वर गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेत्याच्या पत्नीवर ‘या’ महिलेने केले गंभीर आरोप… आलिया सिद्दीकी हिच्याबद्दल मोठी गोष्ट आली सर्वांसमोर…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Sidiqqui) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सतत पतीवर गंभीर आरोप करणारी नवाजची पहिली पत्नी आलिया सिद्दीकी आता मोठी अडचणीत अडकली आहे. आलिया सिद्दीकी हिच्यावर तिच्या एका जवळच्या मैत्रीणीने फसवणुकीचे आरोप केले आहेत. ज्यामुळे आलिया सिद्दीकी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. महत्त्वाचं म्हणजे आलिया सिद्दीकी आणि मैत्रीण मंजू गंडवाल हिने नवाज याच्या पहिल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. मंजू गंडवाल हिने आलियावर लाखो रुपये घेतल्याचे आरोप केले आहेत.

मंजू हिच्या म्हणण्यानुसार, आलियाने चार वर्षांपूर्वी मैत्रीणीच्या आई – वडिलांकडून ५० लाख रुपये कर्ज म्हणून घेतले होते. आज इतक्या वर्षांनंतर देखील आलियाने मंजू हिच्या आई – वडिलांचे पैसे परत केले नाहीत. सिनेमाच्या प्रॉडक्शनसाठी आलियाला पैशांची गरज होती. तेव्हा मंजू हिच्या कुटुंबाने आलियाची मदत केली. पण ५० लाख रुपयांपैकी आलियाने फक्त २७ लाख रुपये परत जदिले आहेत.

एवढंच नाही तर, आलियाने सिनेमाचे एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर यांचे देखील ७ लाख रुपये परत केले नसल्याचा धक्कादायक खुलासा आलियाची मैत्रीण मंजू हिने केला आहे. सध्या सर्वत्र आलिया आणि मंजू यांच्या वादाची चर्चा आहे. मंजू आणि आलिया यांच्यातील पैशांचं प्रकरण आता कोर्टापर्यंत पोहोचलं आहे.

हे सुद्धा वाचा



पुढे मंजू म्हणाली, आलिया सिनेमा प्रदर्शित होण्याआधी काही चेक दिले होते. पण तिने दिलेले चेक बाउंस झाले. आलियाने १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सर्व पैसे परत करण्याचं वचन दिलं होतं. पण तिने अद्याप पैसे दिलेले नाही. एवढंच नाही तर, आलिया याप्रकरणी कायदेशीर नोटीस देखील बजावण्यात आली आहे. अशी माहिती देखील मंजू गंडवाल हिने दिली आहे.

मंजू, आलिया हिच्यावर आरोप करत असताना आलियाच्या वकिलांनी मात्र नवाजच्या पहिल्या पत्नीची बाजू मांडली आहे. आलियाची आर्थिक परिस्थिती सध्या ठिक नाही. तिच्याकडे पैसे आल्यानंतर आलिया मंजूच्या आई – वडिलांचे पैसे देईल असं देखील आलियाचे वकील म्हणाले. आलिया सतत नवाझुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे.

नुकताच आलियाने नवाझुद्दीन सिद्दीकी याच्यावर बलात्काराने आरोप करत तक्रार दाखल केली. पतीवर बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर आलियाने मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. सध्या आलिया आणि नवाझुद्दीन सिद्दीकी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पण आता मैत्रीने आरोप केल्यानंतर आलियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *