MC Stan | लाईव्ह शोमध्ये एमसी स्टॅन याला करण्यात आली मारहाण? धक्कादायक प्रकार आला उघडकीस – MC Stan’s show was disrupted by Karni Sena

मनोरंजन


बिग बाॅस 16 पासून एमसी स्टॅन हा प्रचंड चर्चेत आला आहे. एमसी स्टॅन हा सध्या भारत दाैऱ्यावर असून मोठ्या शहरांमध्ये एमसी स्टॅन याचे शो आहेत. बिग बाॅस 16 मधील एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांची मैत्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

MC Stan | लाईव्ह शोमध्ये एमसी स्टॅन याला करण्यात आली मारहाण? धक्कादायक प्रकार आला उघडकीस

Image Credit source: Instagram

मुंबई : बिग बाॅस 16 चा विजेता एमसी स्टॅन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सध्या एमसी स्टॅन (MC Stan) हा भारत दाैऱ्यावर असून मोठ्या शहरांमध्ये तो आपले शो करताना दिसत आहे. मात्र, नुकताच एमसी स्टॅन याच्या इंदूर येथील शोमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे कळत आहे. करणी सेनेच्या (Karni Sena) कार्यकर्त्यांनी एमसी स्टॅन याच्या शोमध्ये गोंधळ घातल्याचे कळत आहे. यानंतर शो रद्द करण्यात आला आणि शो अर्धवट सोडून जाण्याची वेळ एमसी स्टॅन याच्यावर आली. इतकेच नाहीतर यादरम्यान पोलिसांनी देखील घटनास्थळी धावत घेत साैम्य लाठीचार केला. यावेळी एमसी स्टॅन याला धमकी दिल्याचे देखील कळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 मार्चच्या रात्री इंदूरच्या लासुदिया पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये एमसी स्टॅनचा लाईव्ह कॉन्सर्ट सुरू होता. दरम्यान, करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक स्टेजवर जात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. एमसी स्टॅन याने शोदरम्यान आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे.

शोमध्ये आक्षेपार्ह, असभ्य शब्द वापरल्यास निषेध करण्यात येईल, असा इशाराही करणी सेनेने पूर्वीच दिला असल्याचे सांगितले जात आहे. शोमध्ये एमसी स्टॅन याने काही आक्षेपार्ह शब्द वापरले, यामुळेच करणी सेनेने गोंधळ घातल्याचे कळत आहे. इतकेच नाहीतर हा गोंधळ इतका जास्त वाढला की, चक्क एमसी स्टॅन याला शो अर्धवट सोडून परतावे लागले.

एमसी स्टॅन याने लगेचच स्टेज सोडला. मात्र, त्यानंतरही बऱ्याच वेळ करणी सेनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरूच होता. एक चर्चा अशी देखील आहे की, यादरम्यान एमसी स्टॅन याला धमकावण्यात आले. या गोंधळाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलिसांनी साैम्य लाठीचार देखील केला.

एमसी स्टॅन याच्या शोमध्ये अशाप्रकारचा गोंधळ सुरू झाल्याने काही वेळामध्येच हॉटेल व्यवस्थापनाने शो थांबवण्याच निर्णय घेतला आणि त्यांनी शो रद्द झाल्याचे काही वेळामध्ये जाहिर केले. शो रद्द झाल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी बघायला मिळाली. या शोमध्ये लोकांची गर्दी अत्यंत जास्त होती. यादरम्यान एमसी स्टॅन याला मारहाण झाल्याची देखील चर्चा आहे.

एमसी स्टॅन याने बिग बाॅस 16 जिंकल्यानंतर जाहिर केले की, मी भारत दाैरा करणार असून मी या मोठ्या शहरांमध्ये शो करणार आहे. त्यानंतर एमसी स्टॅन याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. बिग बाॅस 16 नंतर एमसी स्टॅन याची फॅन फाॅलोइंग वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *