Kangana Ranaut | कंगना राणावत हिच्याबद्दल तापसी पन्नू हिने केले धक्कादायक विधान, थेट म्हणाली… – Taapsee Pannu made a big statement about Kangana Ranaut

मनोरंजन


बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत राहते. कंगना राणावत आणि तापसी पन्नू यांच्यामधील वाद सर्वांनाच माहिती आहे. कंगना राणावत आणि तापसीमध्ये मोठा वाद झाला होता.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ही कायमच वादामध्ये अडकते. विषय कोणताही असो कंगना आपले मत मांडल्याशिवाय राहत नाही. यामुळे अनेकदा कंगना वादात सापडते. विशेष म्हणजे कायमच कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूडचे काही कलाकार असतात. काही दिवसांपूर्वीच कंगना राणावत हिने धक्कादायक आरोप केले होते. कंगना राणावत ही कायमच सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी कंगना हिने तिच्या आईचे काही फोटो (Photo) शेअर केले होते. या फोटोमध्ये कंगना राणावत हिची आई शेतामध्ये काम करताना दिसली होती. कंगना राणावत हिची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.

कंगना राणावत आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यामधील वाद तर सर्वांनाच माहिती आहे. नेपोटिझमच्या विषयावरून यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता. कुठेतरी तापसी पन्नू ही कायमच नेपोटिझमचे समर्थन करताना दिसते. यामुळे तापसी पन्नू ही कायम कंगना राणावत हिच्या निशाण्यावर असते. कंगना आणि तापसी पन्नू यांनी बऱ्याच वेळा एकमेकींविरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

नुकताच तापसी पन्नू हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये तापसी पन्नू हिला कंगना राणावत हिच्याबद्दल विचारण्यात आले. यावेळी बोलताना तापसी पन्नू म्हणाली की, मी यावर काय बोलू? आता मला याचे अजिबात वाईट वाटत नाही. मी ज्यावेळी बाॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले, त्यावेळी मी पहिल्यांदा तिला पिंकच्या स्क्रिनिंगमध्ये भेटले होते. फक्त हॅलो आणि धन्यवाद वगैरे आमच्यामध्ये झाला होता.

पुढे तापसी पन्नू म्हणाली की, भविष्यात जरी मला कंगना कुठे भेटली तरीही मी तिच्याजवळ जाऊन नमस्कार करेल. मुळात म्हणजे मला तिचा काही प्रॉब्लेम नाहीये, तिला माझा प्रॉब्लेम आहे. मला पहिल्यांदा झटका लागला होता. ती इतकी चांगली अभिनेत्री आहे…जेव्हा मला स्वस्त कॉपी म्हटले गेले तेव्हा मी म्हणाले की ती एक चांगली अभिनेत्री आहे.

कंगना राणावत हिने विकिपीडियावर देखील मोठा आरोप केलाय. कंगना राणावत हिने एक पोस्ट शेअर करून म्हटले की, माझा वाढदिवस हा 24 मार्चला आहे. मात्र, विकिपीडियाने चुकीची माहिती देत माझा वाढदिवस हा 20 मार्च म्हटले आहे. यामुळे अनेकजण मला 20 मार्चला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, असे म्हणत कंगनाने एक पोस्ट शेअर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *