Crop Damage | नादचखुळा! शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांनी मोबाईल नंबर केला जाहीर, एका झटक्यात मिळणार मदत

कृषी


Crop Damage | सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना आता सरकारकडून आर्थिक नुकसानीची भरपाईची आशा लागली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेती (Crop Damage) पिकांना फटका बसला असून, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे (Crop Damage) तातडीने करण्यात यावे असे निर्देशही मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आले होते. आता याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे.

शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीची माहिती तात्काळ सरकारकडे देण्यात यावी यासाठी आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी एक मोठा पाऊल उचलल आहे. जिल्ह्यानुसार किंवा गावानुसार पिकाचे पंचनामे करण्यासाठी दिरंगाई होते. याचंमुळे शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई तात्काळ मिळत नाही.

थेट कृषिमंत्र्यांनी मोबाईल नंबर केला जाहीर
नुकसानीची माहिती तात्काळ मिळण्यासाठी आता राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट आपला मोबाईल नंबर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. तरी आता या मोबाईल नंबर वर संपर्क साधून आपल्या नुकसानीची माहिती थेट कृषिमंत्र्यांना देऊ शकतात. यामुळे आता नुकसान भरपाई मिळण्यासाठी हालचाली जलद होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर या नुकसानीची भरपाई मिळेल.

कृषिमंत्र्यांचा मोबाईल नंबर
शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती तसेच नुकसान झालेल्या पिकाचा फोटो कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेल्या नंबरवर पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यानाचा 9422204367 मोबाईल नंबर आहे. तर 022-22876342, 022-22875930 हे दोन कृषिमंत्र्यांच्या कार्यालयातील संपर्क आहेत. त्याचबरोबर 022-22020433 त्यांनी हा निवास स्थानाचा नंबर देखील जाहीर केला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Nadachkhula! Agriculture Minister has announced a mobile number for farmers, help will be available in one fell swoop


आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *