Alia Bhatt हिच्यासोबत भांडण झाल्यानंतर असं काय करतो रणबीर कपूर, ज्यामुळे… – ranbir Kapoor break silence on fight with alia bhatt

मनोरंजन


पती – पत्नीचं भांडण झाल्यानंतर नक्की कोणती चूक होते? आलियाह हिच्यासोबत भाडंण झाल्यानंतर रणबीर निवडतो ‘हा’ पर्याय आणि इतरांना देखील सांगतो..

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर (ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट कपूर (alia bhat) कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडचं सर्वात क्यूट कपल म्हणून आलिया आणि रणबीर यांची ओळख आहे. सध्या आलिया आणि रणबीर मुलगी राहा हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगताना दिसत आहेत. मुलीच्या जन्मानंतर आलिया आणि रणबीर यांना कायम त्यांच्या चिमुकलीबद्दल विचारलं जातं. कपल देखील राहा हिच्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. पण आता रणबीर कपूर याने मुलगी राहा हिच्याबद्दल नाही तर, पत्नी आलियाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहे. पत्नी आलियासोबत भांडण झाल्यावर अभिनेता काय करतो… याबद्दल रणबीर याने सांगितलं आहे. सध्या रणबीरने केलेलं वक्तव्य सर्वत्र व्हायरल होत आहे.

रणबीर कपूर याने अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या What Women Want या चॅट शोमध्ये खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहे. आलिया हिच्यासोबत भांडण झाल्यावर काय करतोस? असा प्रश्न करीना हिने रणबीर याला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत असताना अभिनेत्याने पत्नी आलिया हिचा उल्लेख वकील म्हणून केला.

रणबीर म्हणाला, ‘भांडण झाल्यानंतर तर मी काही काळ अंतर ठेवतो. आलिया स्वतःला वकील समजते. तिच्यासोबत काही चुकीचं होत आहे, असं तिला वाटलं, तर ती स्वतःची बाजू सिद्ध करत नाही तोपर्यंत शांत बसत नाही. मी एक असा व्यक्ती आहे, ज्यामध्ये अहंकार नाही. माझी काही चूक असेल किंवा नसेल मी सॉरी बोलून आनंदी राहतो. भांडण झाल्यानंतर मला काही काळ अंदर ठेवायला आवडतं…’

हे सुद्धा वाचापुढे अभिनेता म्हणाला, ‘जेव्हा कपलमध्ये भांडणं होतात. तेव्हा दोघेही एकमेकांना त्रास देण्यासाठी असं काही बोलतात, ज्याचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो. अशात समोरच्याला वाटतं तुम्ही असाच विचार करत आहात. त्यानंतर त्याच तीन – चार गोष्टींमुळे भांडणं होतात. अशा परिस्थितीत गोष्टी निट हाताळाव्या लागतात..’ असं देखील अभिनेता म्हणाला…

गेल्या वर्षी झालं आलिया – रणबीर यांचं लग्न

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी २०२२ मध्ये लग्न केलं. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीर यांच्या मुलीचं नाव राहा कपूर असं आहे. पण अद्याप दोघांनी लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. दोघांनी राहासाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आलिया – रणबीर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता एनिमल सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तर दुसरीकडे आलिया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *