बाॅक्स ऑफिसवर राणी मुखर्जी, कपिल शर्मा यांची जादू नाहीच, रणबीर कपूर याच्या चित्रपटाची तूफान कामगिरी सुरू – Rani Mukerji, Kapil Sharma movie not responding on first day, Ranbir Kapoor’s film collects well at box office

मनोरंजन


रणबीर कपूर याच्या तू झूठी मैं मक्कार चित्रपटाचा जलवा बघायला मिळाला. तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाला रिलीज होऊन दहा दिवस झाले आहेत. मात्र, अजूनही चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. चाहत्यांना रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट आवडलाय.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर हा त्याच्या आगामी तू झूठी मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. पठाण चित्रपटानंतर अक्षय कुमार याचा सेल्फी आणि कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याचा शहजादा हे चित्रपट रिलीज झाले होते. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अक्षय आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटांनंतर रणबीर कपूर याचा चित्रपट रिलीज झाला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय.

विशेष म्हणजे शुक्रवारी चार चित्रपट रिलीज झाले आहेत. यामध्ये कपिल शर्मा, राणी मुखर्जी अशा मोठ्या स्टारचे चित्रपट रिलीज झाले असूनही बाॅक्स आॅफिसवर फक्त आणि फक्त रणबीर कपूर याच्या तू झूठी मैं मक्कार चित्रपटाचा जलवा बघायला मिळाला. तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाला रिलीज होऊन दहा दिवस झाले आहेत.

कपिल शर्मा याचा ज्विगाटो, राणी मुखर्जी हिचा मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे, कब्जा हे चित्रपट रिलीज झाले आहे. मात्र, दहाव्या दिवशीही या नुकताच रिलीज झालेल्या चित्रपटांपेक्षा अधिक कमाई रणबीर कपूर याच्या तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाने केलीये. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

तू झूठी मैं मक्कार हा रणबीर कपूर याचा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर 8 मार्च रोजी रिलीज झालाय. नऊ दिवसांमध्ये चित्रपटाने 92 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. विशेष म्हणजे पुढील काही दिवसांमध्ये चित्रपटाच्या विकेंडला चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिसवर कलेक्शनमध्ये वाढ होईल, असे सांगितले जात आहे.

शुक्रवारी तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाने 3.50 लाखांचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. म्हणजेच कपिल शर्मा आणि राणी मुखर्जी यांच्या चित्रपटाला कमाईमध्ये रणबीरच्या चित्रपटाने मागे टाकले आहे. रणबीर कपूर हा तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला आहे.

रणबीर कपूर हा तू झूठी मैं मक्कार चित्रपटाच्या प्रमोशनवेळी त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगताना देखील दिसला होता. यावेळी रणबीर कपूर याने म्हटले होते की, मला सध्या आलिया आणि माझी मुलगी राहा यांची प्रचंड आठवण येत आहे. आलिया सध्या काश्मीर येथे असून तिथे ती तिच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहे. आलिया ही राहा हिला सोबत घेऊन गेलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *