फरहाद सामजी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, सोशल मीडियावर संतापाची लाट, थेट हेरा फेरी 3 चित्रपटातून… – There is a demand on twitter to remove farhad samji from Hera Pheri 3 movie

मनोरंजन


हेरा फेरी 3 चित्रपटाबद्दल दररोज मोठे खुलासे होताना दिसत आहेत. या चित्रपटाची शूटिंग याचवर्षी केली जाणार आहे. अगोदर अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या चित्रपटाला करण्यास नकार दिला होता. मात्र, आता परत एकदा हा चित्रपट चर्चेत आलाय.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरी 3 हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार याने जाहिरपणे सांगितले होते की, मला हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) चित्रपटाची स्क्रीप्ट अजिबात आवडली नसल्याचे मी चित्रपटाला नकार दिला. अक्षय कुमार याचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला.अक्षय कुमार याच्या या विधानावर चित्रपट निर्मात्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. अक्षय कुमार (Akshay Kumar) याने हेरा फेरी 3 चित्रपटाला नकार दिल्यानंतर अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन हा हेरा फेरी 3 मध्ये दिसणार असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे चित्रपट निर्माते अक्षय कुमार याच्यासोबतच कार्तिक आर्यन याच्या संपर्कात होते.

चित्रपट निर्मात्यांनी अक्षय कुमार याने सांगितल्याप्रमाणे स्क्रीप्टमध्ये काही बदल केले. हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार हा दिसणार नसल्याचे कळताच प्रेक्षकांमध्ये नाराजी बघायला मिळाली. शेवटी अचानक अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या चित्रपटाला होकार दिला. विशेष म्हणजे फक्त अक्षय कुमार हाच नाहीतर बाॅलिवूडमधील दुसराही मोठा अभिनेता हेरा फेरी 3 मध्ये दिसणार आहे.

हेरा फेरी 3 चित्रपटात संजय दत्त देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये संजय दत्त याने सांगितले की, मी हेरा फेरी 3 चित्रपटाचा भाग होण्यास इच्छुक आहे. हेरा फेरी 3 ची सर्वच टिम जबरदस्त आहे. मला अशा टिमसोबत काम करण्याची संधी मिळालीये. याच वर्षी हेरा फेरी 3 या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.

हेरा फेरी 3 हा चित्रपट चर्चेत असतानाच सोशल मीडियावर चाहते एक वेगळी मागणी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हेरा फेरी 3 चे दिग्दर्शक फरहाद सामजीला चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. हेरा फेरी 3 आणि फरहाद सामजी यांची नावे ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.

हजारो लोकांनी आपला मोर्चा हा फरहाद सामजीकडे वळवला आहे. यांची एकच मागणी आहे, ती म्हणजे हेरा फेरी 3 मधून फरहाद सामजीला काढा, लोकांनी याचे अनेक ट्विट शेअर केले आहेत. एका युजर्सने पोस्ट शेअर करत म्हटले की, हेरा फेरी 3 साठी फरहाद सामजीला का कास्ट करण्यात आले हे आम्हाला निर्मात्यांकडून जाणून घेण्याची इच्छा आहे….फरहादला चित्रपटातून बाहेर काढा…

दुसऱ्या युजर्सने लिहिले की, मी सांगतो की, हेरा फेरी 3 चित्रपट धोक्यात आहे. खरोखरच हेरा फेरी 3 चा दिग्दर्शक बदलण्याची खूप जास्त गरज आहे. तिसऱ्याने लिहिले की, जर फरहाद सामजी हिने हेरा फेरी 3 चे दिग्दर्शक केले तर हा चित्रपट फ्लाॅप जाणार म्हणजे जाणार…यामुळे अजूनही वेळ गेली नाहीये…फरहाद सामजीला चित्रपटातून काढून टाका.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *