ज्युनियर एनटीआर याला मागून थेट एका व्यक्तीने पकडले, पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक, व्हिडीओ व्हायरल – A video of Junior NTR has gone viral on social media

मनोरंजन


आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यापासून चित्रपटाची संपूर्ण टिम ही चर्चेत आहे. आता नुकताच ज्युनिअर एनटीआर याच्याबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मुंबई : अभिनेता ज्युनियर एनटीआर सध्या प्रचंड चर्चेत आहे. आरआरआर (RRR) चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर फक्त आणि फक्त आरआरआरच्या टिमची चर्चा आहे. आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर पुरस्कार (Oscars Awards) जिंकला आहे. हा पुरस्कार जिंकल्यानंतर अनेकांनी आरआरआर चित्रपटाच्या टिमचे काैतुक केले. इतकेच नाहीतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करत आरआरआर चित्रपटाच्या टिमला शुभेच्छा दिल्या. यासोबतच बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी चित्रपटातील कलाकारांचे अभिनंदन केले.

मुळात म्हणजे ज्युनियर एनटीआर याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त अशी आहे. सध्या सोशल मीडियावर ज्युनियर एनटीआर याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ज्युनियर एनटीआर याला एका कार्यक्रमात चाहता मागून येऊन पकडताना दिसतोय. हा चाहता ज्युनियर एनटीआर याच्या सुरक्षारक्षकांना चकमा देऊन ज्युनियर एनटीआर याच्याजवळ जातो.

हा चाहता ज्युनियर एनटीआर याच्याजवळ गेल्याचे बघताच त्याचे सुरक्षा कर्मचारी हे चाहत्याला ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, ज्युनियर एनटीआर हा लगेचच चाहत्यासोबत गळाभेट येतो आणि त्याला भेटतो. विशेष म्हणजे चालत असताना तो चाहत्यासाठी थांबतो देखील. विशेष म्हणजे सुरक्षा कर्मचारी हे चाहत्याला हात लावताना देखील दिसत आहेत. मात्र, ज्युनियर एनटीआर हा चाहत्याला आपल्या जवळ घेतो.

आता ज्युनियर एनटीआर याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी ज्युनियर एनटीआर याचे काैतुक केले आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एका युजर्सने लिहिले की, आता मला समजले की, साऊथच्या स्टारला चाहते इतके जास्त प्रेम का देतात? दुसऱ्याने लिहिले की, साऊथच्या स्टारकडून बाॅलिवूडच्या लोकांनी अशा गोष्टी घेण्याची गरज आहे.

प्रत्येकजण हा व्हिडीओ पाहून ज्युनियर एनटीआर याचे काैतुक करत आहे. आता हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केलीये. करण जोहर याने आरआरआर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर म्हटले होते की, आरआरआर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर मी बेडवर उभे राहत उड्या मारल्या. बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी आरआरआर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *