‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ फेम कॉमेडियनवर बलात्काराचे आरोप; पोलिसांकडून तपास सुरु – great indian laughter challenge fame khayali saharan in trouble

मनोरंजन



‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ फेम कॉमेडियनच्या अडचणीत मोठी वाढ…. नोकरी देण्याचं आमिष दाखवून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरु

'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' फेम कॉमेडियनवर बलात्काराचे आरोप; पोलिसांकडून तपास सुरु

Image Credit source: Social Media

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन ख्याली सहारण याच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ फेम कॉमेडियन ख्याली सहारण याच्या विरोधात एका २५ वर्षीय तरुणीने बलात्कारासारखे गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे कॉमेडियन वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. जयपूर येथील हॉटेलच्या खोलीत २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचे आरोप करत कॉमेडियन ख्याली सहारण (khayali saharan) याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरुणीने केलेल्या आरोपांच्या आधारावर मानसरोवर पोलीस स्थानकात कॉमेडियन विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामुळे ख्याली सहारण याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना सोमवारी घडली आहे. ख्याली सहारण फक्त एक कॉमेडियन नसून ‘आप’ पक्षाचा कार्यकर्ता देखील आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने ख्याली सहारण याने नशेत असताना २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे. मानसरोवर पोलीस स्थानकातील उपनिरीक्षक संदीप यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महिलेच्या तक्रारीनंतर कॉमेडियन विरोधात आयपीसी कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.’

महत्त्वाचं म्हणजे २५ वर्षीय तरुणी श्रीगंगानगर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवाय तरुणी एका फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. जवळपास महिनाभरापूर्वी दुसऱ्या महिलेसोबत कामाच्या निमित्ताने तरुणी कॉमेडियनच्या संपर्कात आली.

हे सुद्धा वाचा



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉमेडियन ख्याली सहारण याने एका हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्या होत्या. एक स्वतःसाठी आणि दुसरी तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या महिलेसाठी. मिळालेल्या माहितीनुसार कॉमेडियनने दोघींना मद्यपान करण्यास भाग पाडले. त्यानंतर महिला खोलीतून निघून गेली आणि कॉमेडियन ख्यालीने २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला.

कॉमेडियन ख्याली सहारण याच्याबद्दल सांगायचं झालं तर, कॉमेडियन ‘द ग्रेट इंडियन चॅलेंज’ सीझन २ चा स्पर्धक होता. पण सीझनच्या दुसऱ्या भागाचा विजेता रौफ लाला ठरला. एवढंच नाही तर ख्याली सहारण अभिनेता कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’ पाहुणा म्हणून देखील झळकला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *