अभिनेत्री कधीही आई होणार नाही समजल्यानंतर देखील बॉयफ्रेंडने सोडली नाही साथ… प्रेम यालाच म्हणतात – Payal Rohatgi Love Story with Sangram Singh

मनोरंजन


प्रेम खरं असेल तर, साथ कधीच सोडत नाही… मातृत्व नशीबात नसणं महिलेसाठी दुर्भाग्य, तरी देखील त्याने कधीही सोडली नाही अभिनेत्रीची साथ.. लग्न केल्यानंतर आज जगत आहेत आनंदाने आयुष्य…

मुंबई : आपल्या आयु्ष्यात देखील एक छोटं, गोंडस बाळ असावं… अशी प्रत्येक कपलची इच्छा असते. पण काही कारणामुळे अनेक महिलांना आयुष्यात मातृत्वाचं सुख अनुभवता येत नाही. ज्यामुळे महिलांना आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाचा त्याग करावा लागतो. असाच प्रसंग एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या आयुष्यात देखील आला. पण अभिनेत्री कधीही आई होणार नाही समजल्यानंतर देखील बॉयफ्रेंडने तिची साथ कधीही सोडली नाही, त्याने तिच्यासोबत लग्न केलं. आज अभिनेत्री पतीसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री पायल रोहतही (Payal Rohatgi) आहे. पायल कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पण काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती.

टीव्ही वरील वादग्रस्त लॉक अप (Lock Upp) शोमध्ये पयलाने तिच्या खासगी आयुष्याचा मोठा खुलासा केला होता. शोमध्ये पायल हिने कुस्तीपटू संग्राम सिंहने (sangram singh) याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. पायल आणि संग्राम सिंह गेली 12 वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत.

हे सुद्धा वाचा



पायल हिने गरोदर राहिल्यानंतर बॉयफ्रेंड संग्राम याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण तसं काही झालं नाही. ज्यामुळे पायलने संग्राम याला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला. पण कठीण काळात कधीही संग्राम याने पायलची साथ सोडली नाही.

पायल हिच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल संग्राम म्हणाला, ‘पायलकडून मी खूप काही शिकली आहे. चांगल्या वाईट काळात तिने कधीही माझी साथ सोडली नाही. आम्ही कायम एकमेकांची साथ दिली. पुढे देखील एकमेकांच्या सोबत राहू. ती आई होवू शकत नाही, याचा अर्थ मी तिची साथ सोडेल असं कधीही होणार नाही. मी पायलला कधीही सोडणार नाही..’ असं म्हणत संग्राम याने पायलवर असलेलं त्याचं प्रेम व्यक्त केलं.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर पायल आणि संग्राम यांनी गेल्यावर्षी मोठ्या थाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. जवळपास 12 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी 9 जुलै 2022 रोजी आग्रा येथे सप्तपदी घेतल्या. आता पायल आणि संग्राम वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत.

पायल रोहतगी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री अनेक मुद्द्यांवर महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते. ज्यामुळे अनेकदा अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *