नुकतंच या अभिनेत्रीला मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळत आहे.

Ajay devgan
मुंबई : अभिनेता अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’मध्ये त्याच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ताने गुडन्यूज दिली आहे. इशिता ही अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. ती लवकरच आई होणार आहे. इशिताने स्वत: ही गोड बातमी चाहत्यांनी दिली नाही किंवा प्रेग्नंसीबाबत तिने कोणती पोस्ट शेअर केली नाही. मात्र तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तिचा बेबी बंप सहज पहायला मिळतोय. इशिताला नुकतंच मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून चाहते इशितावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.