Weather Forecast | अर्रर्र..! राज्यात आणखी पाच दिवस पावसासह गारपीटीचा इशारा, शेतकऱ्यांनो जाणून घ्या कुठे?

कृषी


Weather Forecast | राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या जीवाची घालमेल होत आहे. ज्याचं कारण म्हणजे राज्यात पडणारा अवकाळी पाऊस. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अवकाळी (Weather Forecast) पावसाला नासाडी पाऊस असही म्हटलं जातं. कारण हा पाऊस काही कामाचा नसतो. यामुळे शेती पिकांचे नुकसानच होते. राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच पुन्हा एकदा हवामान (Weather Forecast) विभागाने राज्यात अवकाळी पावसाचे दिवस वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू असताना पुन्हा एकदा हवामान (Weather News) विभागाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. शेतकऱ्यांची पिके काढणीला आली आहेत, अगदी हातात तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावण्याची शक्यता आहे. या जुलमी पावसामुळे बळीराजा अगदी कात्रीतच सापडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात हवामान विभागाने (Today’s Weather Forecast) कुठे पाऊस पडेल याचा अंदाज. वर्वतला आहे.

कुठे पडेल पाऊस?
हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. तर राज्यातील कोकण भाग सोडून महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी वीजा व वादळी वाऱ्यासह किरकोळ पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याबरोबरच मध्य महाराष्ट्र (नंदुरबार ते सोलापूर), मराठवाड्यात (छत्रपती संभाजीनगर ते नांदेड पर्यंत ) या ठिकाणी गारपिट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर विदर्भात आज आणि उद्या देखील गारपीट होऊ शकते.

नागरिकांसह शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
राज्यात गारपिट आणि पाऊस होणार असल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, विदर्भ, मराठवाडा, चंद्रपूर, नागपूर, नंदुरबार, कोल्हापूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Arrrr..! Hail warning with rain for five more days in the state, farmers know where?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *