नेहाने जानेवारी 2020 मध्ये व्यावसायिक शार्दुल बयासशी लग्न केलं. ती बिग बॉसच्या बाराव्या सिझनमध्येही झळकली होती. नेहाने ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.

नेहा पेंडसे
Image Credit source: Instagram
मुंबई : मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे या अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहीत नाही. ती गोष्ट म्हणजे नेहा सहा गोंडस मुलांची आई आहे. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉक शोमध्ये नेहाने ही गोष्ट कबूलही केली आहे. आता नेहाची ही क्युट मुलं कोण आहेत आणि हे नेमकं काय प्रकरण आहे, याचं उत्तर प्रेक्षकांना येत्या शुक्रवारी म्हणजेच 17 मार्च रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर मिळणार आहे.