Kapil Sharma | कपिल शर्मा याला पाहून बॉलिवूडच्या ‘खलनायक’ची अशी होती प्रतिक्रिया, पहिल्याच भेटीत… – This was the reaction of Amrish Puri after seeing Kapil Sharma

मनोरंजन


कपिल शर्मा हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कपिल शर्मा याच्या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे कपिल शर्माही चित्रपटाते जोरदार प्रमोशन करतोय.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काॅमेडीचा किंग अर्थात कपिल शर्मा (Kapil Sharma) हा त्याच्या ज्विगाटो या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कपिल शर्माचा हा चित्रपट रिलीज झालाय आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचे जबरदस्त असे प्रेम मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे (Movie) प्रमोशन करण्यामध्ये कपिल शर्मा हा व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कपिल शर्मा याने सांगितले की, कशाप्रकारे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. इतकेच नाहीतर यादरम्यान तो सतत दारू पित होता. बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरूख खान (Shah Rukh Khan) याने कपिल शर्मा याला गाडीमधून बसून समजून सांगितले होते.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कपिल शर्मा याने अमरीश पुरी यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले आहे. कपिल शर्मा म्हणाला की, मी ज्यावेळी अमरीश पुरी यांना भेटलो त्यावेळी मी खूप जास्त लहान होतो. अमरीश पुरी हे त्यावेळी गदर चित्रपटाचे शूटिंग करत होते आणि त्याचवेळी मी त्यांना भेटलो होतो.

कपिल शर्मा याच्या वडिलांची ड्यूटी ज्याठिकाणी लागली होती, त्याचठिकाणी गदर चित्रपटाची शूटिंग सुरू होती. त्यावेळी कपिल शर्मा वडिलांना म्हणाला की, मला पण तुमच्यासोबत यायचे आहे. कपिल शर्मा याचे वडिल त्याला घेऊन गेले. कपिल शर्मा ज्यावेळी चित्रपटाच्या सेटवर पोहचला त्यावेळी सेटवर शूटिंग सुरू होती.

विशेष म्हणजे त्यावेळी अमरीश पुरी आणि अमिषा पटेल यांचे शूट सुरू होते. कपिल शर्मा हा अमरीश पुरी यांच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांच्या पाठिला हात लावत होता. यावेळी अमरीश पुरी यांनी मागे वळून बघत म्हटले की, अरे कोण आहे भई? अशा प्रकारे अमरीश पुरी आणि कपिल शर्मा यांची पहिली भेट झाली.

कपिल शर्मा याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ज्यावेळी तो डिप्रेशनमध्ये होता. त्यावेळी तो चक्क दारूच्या नशेमध्ये आमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी गेला होता. यावेळी त्याची पत्नी गिन्नी देखील सोबत होती. कपिल शर्मा याने सांगितले की, त्यावेळी मी काय करत होतो हे मला कळत नव्हते.

मी थोड्यावेळाने आमिताभ बच्चन यांना मेसेज करून साॅरी म्हटले होते. मुळात अमिताभ बच्चन यांनी माझ्या टिमला तिथे पाठवण्यास सांगितले होते. परंतू मी गेलो होतो आणि मी दारूच्या नशेत असल्याने आमिताभ बच्चन यांनी सुरक्षा कर्मचारी मला आतमध्ये जाऊ देत नव्हते. आमिताभ बच्चन यांनी मला आतमध्ये बोलावून घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *