Ajay Devgn | अजय देवगण करणार डबल धमाका, या ठिकाणी अभिनेता दिसणार चित्रपटाचे प्रमोशन करताना – Ajay Devgn will promote the film bholaa at this special place

मनोरंजन


अजय देवगण हा त्याच्या आगामी भोला या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. अभिनेता हा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण याची खास भूमिका आहे.

मुंबई : बाॅलिवूडचा स्टार अजय देवगण (Ajay Devgn) हा त्याच्या आगामी भोला या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अजय देवगण हा दिसतोय. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच अजय देवगण याने चाहत्यांसाठी एका सेशनचे आयोजन केले होते. या सेशनमध्ये अजय देवगण हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. यावेळी अनेक चाहत्यांनी अजय देवगण याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक प्रश्न केले, या प्रश्नांवर त्याने बिनधास्त उत्तरे दिली. शाहरूख खान (Shah Rukh Khan) देखील पठाण चित्रपट (Movie) रिलीज होण्याच्या अगोदर अशाप्रकारच्या सेशनचे आयोजन करताना दिसला होता.

शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवरील अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. पठाण हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. आता पठाण चित्रपटाला रिलीज होऊन 50 दिवस होऊन गेले आहेत. शाहरूख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण ठरला आहे.

एकीकडे बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते. त्यावेळी अजय देवगण याचा दृश्यम 2 हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसला. आता अजय देवगण याच्या आगामी भोला या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भोला चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अजय देवगण हा दिसत आहे. आता भोला चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी थेट वानखेडे स्टेडियमवर अजय देवगण पोहचणार आहे. आज अजय देवगण त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी जाणार आहे.

भोला चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलचे मोठे क्रेझ बघायला मिळत आहे. अजय देवगण याचा भोला हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. एका चाहत्याने सेशनच्या वेळी अजय देवगण याला विचारले होते की सर तुमचा मुलगा युग हा बाॅलिवूडमध्ये कधी पर्दापण करणार आहे. यावर अजय देवगण याने अत्यंत खास उत्तर दिले होते.

सेशनमध्ये अजय देवगण याला एका चाहत्याने शाहरूख खान यांच्यासाठी एक शब्द असे लिहिले होते. यावर उत्तर देताना अजय देवगण याने पठाण चित्रपटाचे काैतुक केले. या सेशनमध्ये अनेक चाहते हे अजय देवगण याला त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देताना दिसत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *