रणबीर – श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. आठव्या दिवशीही चित्रपटाची समाधानकारक कमाई झाली. बुधवारी या चित्रपटाने पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.

रणबीर कपूर, आलिया भट्ट
Image Credit source: Instagram
मुंबई : अभिनेता रणबीर कपूरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात त्याने श्रद्धा कपूरसोबत पहिल्यांदाच काम केलं आहे. ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे. रणबीरचं कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अकाऊंट नाही. मात्र नुकत्याच एका मजेशीर व्हिडीओमध्ये त्याने व्हायरल झालेल्या या भन्नाट मीम्सला रिक्रिएट केलं आहे. रजनीकांत, नाना पाटेकर यांच्या मीम्सची नक्कल करतानाच त्याने पत्नी आलिया भट्टच्याही एका गाजलेल्या मीमची नक्कल केली. हे पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालं. पत्नीचंच मीम रिक्रिएट केल्यानंतर चाहत्यांनीही त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.