…म्हणून रात्री झोपताना जोडीदाराबद्दल मनात राग ठेवून झोपू नका!

महत्वाच्या बातम्या


मुंबई | आपल्या प्रियकर, प्रेयसी किंवा पती, पत्नी यांच्यासोबत रात्री झोपताना नेहमी मनमोकळे पणाने बोलून झोपावं. या मागचं कारण असं की जर तुमच्या मनात त्याच्या किंवा तिच्या विषयी काही राग असेल तर ते सांगणं गरजेचं आहे. नाहीतर त्याचा परिणाम तु्मच्या नात्यावर होऊ शकतो.

ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत वाद झाला आणि तुम्ही ते न मिटवता झोपलात तर त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. मानसिक आरोग्यावर परिणाम होऊशकतो. त्यामुळे सकाळी फ्रेश न वाटणं, उत्साही न वाटणं, किंवा मनात काही तरी राहणं हे तुमच्या नात्यामध्ये अडथळा निर्माण करु शकतं.

अशा समस्या टाळायच्या असतील तर त्यासाठी रात्रीच्यावेळी राग मनात ठेवून झोपू नये. जेव्हा तुमच्या दोघांमध्ये वाद होतात त्यावेळेस ते आपापसात मिटवून घेणं आवशयक आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर ते आपल्या मनात घुटमळू शकतात.

जर तुमच्या मनात एकमेकांबद्दल राग असेल तर लगेच त्या व्यक्तिला सांगा. कारण जर तुम्ही तुमच्या मनात ठेवलं तर तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला झोप लागणार नाही आणि यावरुन अनेक विषय वाढत जातात.

थोडक्यात बातम्या-

‘भाजपत येणाऱ्यांना आम्ही स्वच्छ करतो’; भाजप आमदाराचं वक्तव्य

‘कुणीही गंभीर नाही, पहिलं बाकडं तर’; मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवार भडकले

“तू सटकला लेका, उंची आणि बुद्धी सारखीच आहे तुझी”

भाजपचा बडा नेता अडचणीत; संपत्ती जप्त होणार

पुढचे तीन दिवस महत्त्वाचे; राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *