“मुलींना पैसेवाला बॉयफ्रेंड आणि नवरा हवा असतो, पण…”

महत्वाच्या बातम्या


मुंबई । मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) आपल्या दमदार अभिनयाने कायम चर्चेत असते. मराठी चित्रपटांसोबत तिने हिंदी चित्रपटात सुद्धा प्रमुख भूमिका साकारल्या. सिंघम (Singham) आणि दिल चाहता है (Dil Chahta Hai) या सारख्या चित्रपटात उत्तम व्यक्तिरेखा साकारली.

सोनाली आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवर कायम सक्रिय असते. सोनालीने एक वक्तव्य केलं ज्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली. नुकत्याच एका मुलाखतीत तिने असं काही वक्तव्य केलं ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.

अनेक मुली आळशी आहेत. त्यांना एक असा नवरा हवा किंवा बॉयफ्रेंड हवा ज्याच्याकडे एक चांगली नोकरी असेल, घर असेल, ज्याचा पगार आणखी वाढणार असेल. इतकंच नाही तर मुलींमध्ये एवढी हिम्मत नाहीये की ती म्हणू शकेल मी लग्नानंतर आपल्या घरासाठी काहीतरी करेन, असं वक्त्व्य सोनालीने केलं.

ती स्वतःसाठी कमवू शकेल एवढी धमक तिच्यात नाही. सोनालीच्या या वक्त्यावरुन सोशल मीडियावर विरोध केला तर काहीजणांनी तिचं समर्थन केलं आहे. तिच्या या पोस्टवर युझरसने कमेंटस सुद्धा केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-थोडक्यात बातम्या-

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणार असाल तर आत्ताच व्हा सावध!

शेतकऱ्यांनो सावधान! पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

‘भाजपत येणाऱ्यांना आम्ही स्वच्छ करतो’; भाजप आमदाराचं वक्तव्य

‘कुणीही गंभीर नाही, पहिलं बाकडं तर’; मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवार भडकले

“तू सटकला लेका, उंची आणि बुद्धी सारखीच आहे तुझी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *