भाजपचा बडा नेता अडचणीत; संपत्ती जप्त होणार

महत्वाच्या बातम्या


मुंबई | भाजपचा (Bjp) बडा नेता अडचणीत सापडल्याची माहिती समोर आली आहे. बँकांचं कर्ज थकवल्याने पुण्यातील भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी आपली स्थावर मालमत्ता विविध बँकांकडे गहान ठेवून कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र हे कर्ज काकडे यांनी वेळेत न फेडल्यानं आता बँकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

दरम्यान, या प्रकरणात न्यायालयानं संजय काकडे यांच्या राहत्या बंगल्याचा प्रतिकात्मक ताबा तर शिवाजी हाउसिंग सोसायटीतील फ्लॅटचा ताबा घेण्याचे आदेश दिले आहेत. 

न्यायालयाच्या या आदेशामुळे काकडेंची संपत्ती जप्त होणार असल्याने काकडे अडचणीत सापडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *