अनन्याची बहीण अलाना ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यावर तिने दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अनन्या पांडेची बहीण अलाना पांडेचं लग्न
Image Credit source: Instagram
मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण अलाना पांडे हिच्या लग्नाची धूम पहायला मिळतेय. अलाना ही अभिनेते चंकी पांडे यांचा भाऊ चिक्की पांडेंची मुलगी आहे. बॉयफ्रेंड आयव्हर मॅक्रेशी तिने लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला शाहरुख खान, गौरी खान, आर्यन खान, महिमा चौधरी, जॅकी श्रॉफ यांसह बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर अलाना आणि आयव्हरच्या लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र या लग्नातील अलानाचे कपडे पाहून नेटकरी भडकले आहेत.