ट्रोलर्सबद्दल अजय देवगण याने केले मोठे वक्तव्य, सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबतच्या मैत्रीवरही – Ajay Devgn made a big statement about trollers

मनोरंजन


बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा गेल्या काही वर्षांपासून एका मागून एक असे हिट चित्रपट देताना दिसत आहे. अजय देवगण याच्या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. आता अजय देवगण हा त्याच्या आगामी भोला हा चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगण याचा भोला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

मुंबई : दृश्यम 2 या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर आता अजय देवगण (Ajay Devgn) हा त्याचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आलाय. अजय देवगण याच्या भोला चित्रपटाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. दृश्यम 2 या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी केली. गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण हा त्याच्या आगामी भोला या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे अजय देवगण खास पध्दतीने भोलाचे प्रमोशन करताना दिसत आहे. अजय देवगण याचा बहुचर्चित भोला हा चित्रपट (Movie) 30 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अजय देवगण हा भोला चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याचा भोला चित्रपटातील लूक पुढे आला होता. यामध्ये अजय देवगण याचा धमाकेदार लूक दिसला. आता भोला चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी करताना दिसत आहेत.

नुकताच अजय देवगण याने काही महत्वाच्या गोष्टींवर भाष्य केले आहे. यावेळी ट्रोलर्सबद्दल त्याने आपले मत मांडले आहे. अजय देवगण याला विचारण्यात आले होते की, बाॅलिवूडमधील सुपरस्टार्ससोबत तुझे बॉन्डिंग कसे आहे? यावर अजय देवगण म्हणाला की, आम्ही जरी एकमेकांना जास्त भेटत नसलो तरीही आम्ही एकमेकांसोबत कायम संपर्कात असतो.

आमचे सतत बोलणे होते. ज्यावेळी काही गरज पडते, त्यावेळी आम्ही कायमच एकमेकांचे समर्थन करतो. सलमान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी, संजय दत्त हे आम्ही सर्वजण एकमेकांवर विश्वास करतो आणि इतकेच नाहीतर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे देखील असतो.

ट्रोलर्सबद्दल बोलताना अजय देवगण म्हणाला की, मुळात म्हणजे ट्रोलर्सची संख्या फार कमी आहे, त्या तुलनेत सर्वसामान्य लोकांची संख्या जास्त आहे. चित्रपट किंवा अभिनेते यांच्यापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या जीवनात अनेक चिंता असतात. यामुळे सर्वसामान्य लोक हे चित्रपटाचा ट्रेलर बघतात आणि त्यांना तो वाढला तर ते चित्रपट पाहतात आणि इतरांनाही चित्रपट चांगले असल्याचे सांगतात.

मी सोशल मीडियावर ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, त्याकडे दुर्लक्ष करतो. इतकेच नाहीतर मी माझ्या मुलांना देखील अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे. मी आता या गोष्टींकडे अजिबातच लक्ष देत नाही. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एका खास सेशनचे आयोजन केले होते. या सेशनमध्ये अजय देवगण हा चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *