काय सांगता? चक्क अनिल कपूर यांच्या पत्नीसमोर शाहरुख खान आणि सलमान खान बसले गुडघ्यावर, वाचा काय घडले? – Video of Sunita Kapoor, Shah Rukh Khan and Salman Khan is viral on social media

मनोरंजन


सलमान खान हा त्याच्या आगामी चित्रपटांमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. शाहरुख खान यानेही पठाण चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर आता आगामी जवान या चित्रपटाची शूटिंग सुरू केलीये. नुकताच शाहरुख खान याने डंकी चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी केली.

मुंबई : शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी केलीये. पठाण चित्रपटातील सर्वात खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात सलमान खान (Salman Khan)  याचा केमिओ देखील चाहत्यांना बघायला मिळाला. शाहरुख खान आणि सलमान खान यांना स्क्रीन शेअर करताना पाहून चाहते देखील आनंदी झाले. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसरीकडे पठाण (Pathaan) चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान याने जवान चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलीये.

मुळात म्हणजे 2023 हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत लकी ठरले. याच वर्षी शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. विशेष म्हणजे हा शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान आणि शाहरुख खान हे दोघेही गुडघ्यावर बसलेले दिसत आहेत आणि यांच्यासमोर अनिल कपूर यांची पत्नी सुनीता कपूर या आहेत. या व्हिडीओमध्ये सलमान खान आणि शाहरुख खान हे दोघे एक खास गाणे म्हणताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये सलमान खान याने हातामध्ये माईक पकडलेले दिसत असून समोर सुनीता कपूर या आहेत. या व्हिडीओमध्ये सलमान खान हा गुडघ्यावर बसून ‘ये बंधन तो प्यार का बंधन है’ हे गाणे म्हणताना दिसतोय. यासोबत सलमान खान याच्यासह शाहरुख खान देखील गाणे म्हणतोय. मात्र, शाहरुख खान आणि सलमान खान यांना गाणे म्हणताना पाहून सुनीता कपूर जोरात हसताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे सलमान खान आणि शाहरुख खान यांचे असे लूक पाहून अनिल कपूरही स्वत: ला हसण्यापासून आवरू शकत नसल्याचे दिसत आहे. रिपोर्टनुसार हा व्हिडीओ सोनम कपूर हिच्या लग्नातील एका कार्यक्रमामधील आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर सिंह हा देखील दिसतोय. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *