गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडमधील नेपोटिझम हा विषय गाजत आहे. प्रेक्षक सतत नेपोटिझमचा विरोध करताना दिसत आहेत. मात्र, अनेक बाॅलिवूड कलाकारांनी यापूर्वी नेपोटिझमचे समर्थन केले आहे. त्यामध्ये आता सोनू सूदच्या नावाचा समावेश झालाय.
मुंबई : अक्षय कुमार याच्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा दिसला. कोरोना दरम्यान लोकांच्या मदतीसाठी सोनू सूद हा धावून आला. सोनू सूद हा कोरोनानंतरही लोकांना मदत करताना दिसतो. विशेष म्हणजे मागेल त्याला मदत कोरोनाच्या काळात सोनू सूद याने केलीये. सोनू सूद याला लोक मसीहा म्हणून देखील ओळत आहेत. सोनू सूद हा अगोदर साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करायचा. मात्र, आता सोनू सूद याने बाॅलिवूडमध्ये (Bollywood) खास ओळख निर्माण नक्कीच केलीये. सोनू सूद याची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. विशेष: कोरोनानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झालीये.
नुकताच सोनू सूद याने एक खास मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये सोनू सूद याने एका महत्वाच्या विषयाला हात घातलाय. यावेळी सोनू सूद हा नेपोटिझमवर बोलताना दिसला. सोनू सूद याने नेपोटिझमवर आपले रोखठोक मत मांडले आहे. आपल्या बाॅलिवूड करिअरबद्दल देखील सोनू सूद याने मोठे भाष्य केले आहे.
आपल्या बाॅलिवूड करिअरबद्दल बोलताना सोनू सूद म्हणाला की, मी पहिल्यांदा बाॅलिवूडच्या भगत सिंह या चित्रपटामध्ये काम केले. त्यानंतर मला जोधा अकबर चित्रपट भेटला. त्यानंतर एक एक करून मला चांगल्या चित्रपटांच्या आॅफर आल्या. मी साऊथचे चित्रपट करत होतो. परंतू मला जर बाॅलिवूडच्या एखाद्या चित्रपटामध्ये काही खास आवडले तर मी त्याची स्क्रीप्ट वाचत होतो.
यावेळी सोनू सूद याला नेपोटिझमवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सोनू सूद म्हणाला की, हे बघा हे नेहमीच असेल…ज्यांचे आई वडील हे इंडस्ट्रीमधील आहेत, त्यांच्या मुलांना चित्रपटामध्ये भूमिका मिळणार…आज मी इंडस्ट्रीमध्ये आहे…उद्या माझ्या मुलालाही चित्रपटांची आॅफर येईल. हे सर्व गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेले आहे. हे यापूर्वीही झाले आहे, आताही होणार आहे आणि पुढेही सुरूच राहणार आहे.
पुढे सोनू सूद म्हणाला, या सर्वांमधून तुम्ही कसे बाहेर पडू शकता हे तुमच्या क्षमतेवर सर्वकाही अवलंबून आहे. माझ्या वडिलांचे कपड्यांचे दुकान होते, त्या दुकानावर बसणे माझ्यासाठी कधीही सोपे होते. त्यामुळेच दिग्दर्शकाचा किंवा एखाद्या अभिनेत्याचा मुलगा अभिनेता झाला तर काहीच हरकत नाही तशी.
मुळात म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी त्याच वातावरणात वाढलेले असतात. यामुळे बाहेरून आलेल्या मुलांना संधी मिळणे थोडे अवघड आहे. मात्र, या बाहेरून आलेल्या मुलांना संधी मिळणे आवश्यक आहे. आता सोनू सूद याने नेपोटिझमवर केलेले भाष्य अनेकांना अजिबात पटले नाहीये. नेटकऱ्यानी आता सोनू सून याला टार्गेट करण्यास सुरूवात केलीये.