Shiv Thakare | शिव ठाकरे याने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून डोळे विस्फारतील – Bigg boss 16 contestant Shiv Thakare has bought a new luxury car

मनोरंजन


बिग बॉस 16 पासून एक नाव प्रचंड चर्चेत आले आहे, ते म्हणजे शिव ठाकरे याचे. शिव ठाकरे हा मराठी बिग बॉसचा विजेता आहे. बिग बॉस 16 मध्येही शिव ठाकरे याचा जबरदस्त असा गेम बघायला मिळाला.

मुंबई : बिग बॉस 16 मधून खरी ओळख शिव ठाकरे याला मिळालीये. शिव ठाकरे (Shiv Thakare) हा बिग बॉस मराठीचा विजेता देखील आहे. बिग बॉस 16 चा विजेता जरी शिव ठाकरे हा होऊ शकला नाही, तरीही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात शिवला यश मिळाले आहे. बिग बॉस 16 चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन (MC Stan) अनेकदा म्हणताना दिसला की, माझा भाऊ शिव ठाकरे हाच बिग बॉस 16 चा विजेता आहे. एमसी स्टॅन याचा गेम बिग बॉसच्या घरात काही खास नव्हता. मात्र, त्याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त असल्यामुळे एमसी स्टॅन हा विजेता झाला. अनेकांना वाटते होते की, शिव ठाकरे हा बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चा विजेता होईल .

बिग बॉस 16 चा विजेता जरी शिव ठाकरे हा झाला नसलातरीही शिव ठाकरे याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त वाढलीये. बिग बॉस 16 मध्ये शिव ठाकरे याने जबरदस्त असा गेम नक्कीच खेळलाय. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, साजिद खान, अब्दू रोजिक, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांची मैत्री चाहत्यांना प्रचंड आवडली आहे.

Shiv

आता नुकताच शिव ठाकरे याने आपल्या आयुष्यातील पहिली कार खरेदी केलीये. विशेष म्हणजे अत्यंत महागाडी कार शिव ठाकरेने खरेदी केलीये. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिव ठाकरे याने ही माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. शिव ठाकरे याने काळ्या रंगाची कार खरेदी केलीये.

विशेष म्हणजे शिव ठाकरे याने खरेदी केलेली कार अत्यंत महाग आहे. शिव ठाकरे याने काळ्या रंगाची टाटा हॅरियर कार खरेदी केली आहे. या कारणची किंमत 30 लाख आहे. शिव ठाकरे म्हणाला की, मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेले एक स्वप्न पूर्ण केले आहे. कारण यापूर्वी मी कधीच नवी कार खरेदी केली नव्हती. यापूर्वी मी दोन जुन्या कार खरेदी केल्या होत्या.

शिव ठाकरे कारची पूजा आणि आरती करताना दिसला. यावेळी शिव ठाकरे याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शिव ठाकरे म्हणाला की, ही कार माझ्यासाठी एखाद्या मर्सिडीजपेक्षा नक्कीच कमी नाहीये. माझे एक स्वप्न आज पूर्ण झाले आहे. शिव ठाकरे याच्या पोस्टवर कमेंट करत चाहते त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. बिग बाॅसच्या घरातील मंडळी चाहत्यांना प्रचंड आवडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *