Shahid Kapoor | एकतर्फी प्रेमातून अभिनेत्याच्या मुलीने सर्व मर्यादा ओलांडल्या, शाहिद कपूर याने थेट केली पोलिसात तक्रार – Shahid Kapoor filed a complaint against the actor’s daughter at the police station

मनोरंजन


काही दिवसांपूर्वी शाहिद कपूर याने एक खास मुलाखती दिली होती. तेंव्हापासून अभिनेता हा सतत चर्चेत आहे. शाहिद कपूर याच्याकडे काही मोठ्या चित्रपटाच्या आॅफर आलेल्या आहेत.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी शाहिद कपूर (Shahid Kapoor) याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते की, एक अभिनेता असल्यामुळे त्याला किती जास्त समस्यांचा सामना हा करावा लागतो. इतकेच नाहीतर शाहिद कपूर म्हणाला की, माझ्या मुलांना आता समजत आहे, त्यांचे वडील हे एक अभिनेता आहेत. मी माझ्या मुलांना एक सर्वसामान्य आयुष्य (Life) देऊ इच्छित आहे. परंतू बऱ्याच वेळा ते शक्य होत नाही. एका मुलाखतीमध्ये शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) हिने थेट म्हटले होते की, मला स्टार किड्स या शब्दाचा प्रचंड राग येतो.

शाहिद कपूर याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. मात्र, एका मोठ्या अभिनेत्याची मुलगी शाहिद कपूर याच्या प्रेमामध्ये इतकी जास्त आंधळी झाली होती की, तिला काहीच कळत नव्हते. इतकेच नाहीतर ती शाहिद कपूर याच्या मागे त्याच्या शूटिंगच्या सेटवर देखील पोहचायची. तिने शाहिद कपूर याच्या घराच्या बाजूला असलेल्या एका घरात शिफ्ट झाली होती.

रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूर आणि दिवंगत अभिनेता राज कुमार यांची मुलगी हे एका डान्स क्लासमध्ये एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते. विशेष म्हणजे राज कुमार यांची मुलगी पहिल्याच भेटीमध्ये शाहिद कपूर याच्या प्रेमात पडली. मात्र, राज कुमार यांच्या मुलीमध्ये शाहिद कपूर याचा अजिबात रस नव्हता.

दुसरीकडे ही मुलगी शाहिद कपूर याच्या प्रेमात वेडी झाली होती. ती शाहिद कपूर याच्या मागे त्याच्या चित्रपटाच्या सेटवर पोहचायची. इतकेच नाहीतर तिने शाहिद कपूर याला त्याच्या कारच्या बोनेटवर बसून अनेकदा रोखण्याचा प्रयत्न देखील केला. इतकेच नाहीतर ती शाहिद कपूर याच्यावर इतके जास्त प्रेम करायची की, ती चक्क शाहिद कपूर याच्या शेजारी असलेल्या घरामध्ये शिफ्ट झाली होती.

शाहिद कपूर याच्या शेजारी असलेल्या घरामध्ये शिफ्ट झाल्यावर तिने चक्क आजूबाजूच्या लोकांना आपण शाहिद कपूर याची पत्नी असल्याचे थेट सांगितले. मात्र, यानंतर शाहिद कपूर याने तिच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. शाहिद कपूर याने मीरा राजपूत हिच्यासोबत लग्न केले आणि आता ते दोन मुलांचे पालक देखील आहेत.

शाहिद कपूर याने मीरा राजपूत हिच्यासोबत 2015 मध्ये लग्न गाठ बांधली. मीरा राजपूत ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. कायमच शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे त्यांच्या मुलांसोबत स्पाॅट होतात. मीरा राजपूत हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये थेट नेपोटिझमवर मोठे भाष्य केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *