Akshay Kumar | अक्षय कुमार याला मोठा झटका? चित्रपट निर्माते हा वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत – The makers of Akshay Kumar’s upcoming film can take a big decision

मनोरंजन


गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा चर्चेत आहे. अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. चाहते अक्षय कुमार याच्या हेरा फेरी 3 या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Akshay Kumar | अक्षय कुमार याला मोठा झटका? चित्रपट निर्माते हा वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत

Image Credit source: Instagram

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला होता. अक्षय कुमार याच्या चित्रपटाच्या अगोदर कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन या दोघांचेही चित्रपट बाॅक्स ऑफिसवर (Box office) फ्लाॅप गेले आहेत. विशेष म्हणजे कार्तिक आर्यन याचे तीन चित्रपट यादरम्यान हिट गेले आणि शहजादा फ्लाॅप गेला. मात्र, अक्षय कुमार याचे एका मागून एक असे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

अक्षय कुमार हा सध्या हेरा फेरी 3 चित्रपटामुळेही चर्चेत आहे. हेरा फेरी 3 ची शूटिंगही याचवर्षी सुरू होणार आहे. अगोदर अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला नकार दिला होता. मात्र, आता त्याने हेरा फेरी 3 मध्ये काम करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार याच्यासोबत संजय दत्त हा देखील धमाल करताना दिसणार आहे.

बच्चन पांडे, अतरंगी रे, रक्षा बंधन, सम्राट पृथ्वीराज, राम सेतु आणि आता रिलीज झालेला सेल्फी हे सहा चित्रपट अक्षय कुमार याचे फ्लाॅप गेले आहेत. अक्षय कुमार याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सतत फ्लाॅप जात असल्याने आता अक्षय कुमार याच्या आगामी चित्रपट निर्मात्याने मोठा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

अक्षय कुमार याचा बहुचर्चित ओह माय गॉड 2 या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट पुढे येत आहे. रिपोर्टनुसार निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न करण्याचा निर्णय घेतलाय. हा चित्रपट थेट ओटीटीवर रिलीज केल्या जाणार आहे. मात्र, यावर अजून काही भाष्य चित्रपटाच्या निर्मात्यांनी केले नाहीये.

एका मागून एक चित्रपट अक्षय कुमार याचे बाॅक्स आॅफिसवर मार खाताना दिसत असल्याने निर्मात्यांनी मोठी धसकी घेतल्याचे कळत आहे. सेल्फी चित्रपटाला तर चित्रपटाचे बजेट काढणे देखील शक्य झाले नाही. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अक्षय कुमार हा दिसला होता. सेल्फी हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळत होती. मात्र, प्रत्यक्षात बाॅक्स आॅफिसवर चित्रपट फ्लाॅप गेला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *