
Agricultural Warehouse | भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. येथील नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना प्रचंड काळजी घ्यावी लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे होतेच. राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना (Agricultural Warehouse) वेळोवेळी यासाठी मदत केली जाते. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी देशामध्ये सरकारच्या माध्यमातून विविध योजना देखील राबवल्या जातात. जेणेकरून या योजनांद्वारे शेतकरी आपली आर्थिक स्थिती सुधारणा असते. आता शेतीतील माल (Agricultural Warehouse) काढायचं म्हटलं की, त्या शेतमालाची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे असते. पावसामुळे पिकाचे नुकसान होते म्हणूनच गोदाम असणे गरजेचे आहे. याबाबतच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
गाव तिथे गोदाम
शेतमाल निघाल्यानंतर शेतमाल जपून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना गोदामाची गरज भासते. त्यामुळे आज 13 मार्च 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून गोदामाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी ‘गाव तिथे गोदाम’ ही योजना राज्यामध्ये राबवली जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना या गोदामाचा फायदा घेता येतो. आपल्या शेतमालाची नासाडी होऊ नये म्हणून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
शेतमालाची नासाडी टळते
‘गाव तिथे गोदाम’ ही योजना नाबार्डच्या माध्यमातून राबवली जाते. या योजनेमुळे शेतकरी आपल्या शेतमालाची विक्री फक्त साठवणी अभावी कमी खर्चात विक्री करण्यापासून वाचतात. गावामध्ये गोदामाची उपलब्धता करून दिल्यामुळे शेतकरी आपला शेतमालाची साठवणूक करू शकतात. तसेच पावसापासून या मालाची नासाडी देखील होत नाही.
समिती करण्यात आली गठीत
राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना गरीब शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. गोदाम योजना राबवण्यासाठी आज शासन निर्णयांमध्ये एक समिती गठीत करण्यात आली आहे. या अंतर्गत तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणे गरजेचे आहे. छोट्या शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
Web Title: Farmers’ crops will be safe! A godown for the entire village will be provided by NABARD under this scheme