“इज्जत फक्त तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच आहे का?”

महत्वाच्या बातम्या


मुंबई | भाजप आणि शिवसेनेची सध्या मुंबईत आशीर्वाद यात्रा सुरु आहे. पण या यात्रेतला शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल करण्यात आलाय. या प्रकरणावरुन संबंधितांना अटक झालीय. पण याच मुद्द्यावरुन शरद कोळी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे विधानसभा बंद पाडता. मग डान्सर गौतमी पाटील यांच्यासाठी अशी भूमिका का घेत नाही?, असं ठाकरे गटाचे युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी म्हटलंय.

शीतल म्हात्रे यांच्या व्यतिरिक्त उर्वरीत महिला या भगिनी नाहीत का? त्यांना इज्जत नाही का? इज्जत फक्त तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच आहे का? याचा अर्थ तुम्ही पक्षापात करत आहात, असा घणाघात शरद कोळी यांनी केला.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे ही एकच महिला राज्यामध्ये आहे का? अन्य महिलांवरती अत्याचार होतात. त्यावरती राज्य सरकार का लक्ष देत नाही?”, असा सवाल करत शरद कोळी यांनी राज्य सरकारवर टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *