“राहुल गांधींना देशाबाहेर हाकललं पाहिजे”

महत्वाच्या बातम्या


नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे, असं वक्तव्य भाजपच्या भोपाळ येथील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं आहे. सोमवारी ब्रिटनच्या खासदारांसोबत आयोजित एका कार्यक्रमात म्हटलं होतं.

परदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त होऊ शकत नाही, असं चाणक्यांनी म्हटलं होतं. राहुल गांधींनी त्यांचं हे वक्तव्य खरं असल्याचं सिद्ध केलं आहे, असं प्रज्ञासिंह ठाकूर (Pradnyasinh Thakur) यांनी म्हटलं आहे.

तुम्ही परदेशात बसून म्हणता की, आम्हाला संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी असू शकत नाही. मी अशा राहुल गांधींचा (Rahul Gandhi) धिक्कार करते. त्यांना आता राजकारणात अजिबात संधी देऊ नये, असंही त्या म्हणाल्यात.

तुमची आई इटलीची असल्यामुळे तुम्ही आमच्या भारताचे नाहीत हे आम्ही मान्य केले आहे, असंही प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *