
नांदेड(प्रतिनिधी)-जुनी ता.धर्माबाद येथून एक 28 वर्षीय महिला आपली एक मुलगी (08) आणि मुलगा (05) या दोघांना घेवून बेपत्ता झाली आहे. या महिलेसह बालकांचा शोध लागावा म्हणून धर्माबाद पोलीसांनी शोध पत्रिका जारी केली आहे.
दि.09 मार्च रोजी जुनी येथील विलाल परसराम बोईवार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची बहिण गोदावरी सोमा शेळके (28) ही त्यांच्या माहेरी आई-वडीलांच्या घरी जुनी येथे असतांना दि.8 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता कोणास काही न सांगता आपली दोन लेकरे श्रावणी आणि प्रदीप यांना सोबत घेवून निघून गेली आहे. या माहितीनुसार धर्माबाद पोलीसांनी या प्रकरणी मिसिंग क्रमांक 5/2023 दाखल केला. पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार बी.एम. जाधव यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे.
धर्माबाद पोलीसांनी या मिसिंग संदर्भाने शोध पत्रिका जारी केली आहे. मिसिंगमधील गोदावरीबाई सोमा शेळके यांचे वय 28 वर्ष आहे. रंग गोरा आहे, चेहरा लांबट आहे, नाक सरळ आहे, त्यांनी घरुन निघतांना सहावार साडी व ब्लाऊज परिधान केलेला आहे. पायात चपल आहे, त्यांना मराठी व हिंदी बोलता येते, आपल्या सोबत त्यांनी आपली 8 वर्षाची मुलगी श्रावणी आणि पाच वर्षाचा मुलगा प्रदीप यांनाही सोबत नेले आहे. धर्माबादचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, छायाचित्रात दिसणारी महिला आणि बालके कोणाला दिसली तर त्यांनी त्याबाबतची माहिती धर्माबाद पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बी.एम. जाधव यांना द्यावी किंवा धर्माबाद पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 02465-244933 वर माहिती
द्यावी.
Post Views:
559