
नांदेड(प्रतिनिधी)-नुतन पोलीस उपमहानिरिक्षक डॉ.शशिकांत ह.महावरकर हे दि.13 मार्चपासून 17 मार्च दरम्यान नांदेड जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी करणार आहेत.
नुतन पोलीस उपमहानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर हे दि.13 ते 17 मार्चदरम्यान नांदेड जिल्ह्याच्या पोलीस दलाची सन 2022-2023 ची वार्षिक तपासणी करणार आहेत. या तपासणी दरम्यान पोलीस उपमहानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर हे पोलीस उपविभाग नांदेड शहर, पोलीस ठाणे इतवारा येथे भेट देतील. अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतली. तसेच कवायत निरिक्षण करतील. सैनिक संमेेलन होईल. पोलीस मुख्यालयास भेट देतील. निलंबित पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा आढावा घेतील. सेवानिवृत्त पोलीसांची बैठक घेतील. तसेच अज्ञांकित कक्ष घेतील. पोलीस उपविभाग नांदेड ग्रामीण, पोलीस उपविभाग भोकर येथे भेट देतील आणि अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतील. पोलीस ठाणे लोहा येथे भेट देतील आणि कंधार पोलीस उपविभागाअंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतील. उपविभाग देगलूर येथे तपासणी करतील आणि अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतील. आस्थापना, पत्र व्यवहार शाखा, लेखा शाखा यांच्या टिपणी पाहतील, वाचक शाखा, जिल्हा विशेष शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचे निरिक्षण करतील. उपविभाग माहुर येथे भेट देतील, अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतील आणि गुन्हे परिषदेने या वार्षिक तपासणीचा समारोप होईल.
या वार्षिक तपासणी दरम्यान सर्व पोलीस ठाण्यातील आणि इतर शाखांमधील अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी आप-आपल्या विभागात काय-काय कामे करावीत, कोणते-कोणते अभिलेख अद्यावत ठेवावेत या संदर्भाचे पत्र पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहे.
Post Views:
498