
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
12 मार्च यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक एन.एल.रिठे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमात पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे अधिकारी, पोलीस अंमलदार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, विनोद भंडारे, शामका पवार यांनी उत्कृष्टपणे केले.
महापालिकेत “स्व. यशवंतराव चव्हाण” यांची जयंती साजरी
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड तर्फे दिनांक १२ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण” यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त गुलाम सादेख यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्य प्रशासकीय इमारत, तिसरा माळा, प्रशिक्षण हॉल येथे राजकुमार लोहिया, साहेबराव जोंधळे,सुजाद, सुनिल वाघमारे यांच्या सह कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Post Views:
68