
नांदेड(प्रतिनिधी)-तेलंगणा राज्यातील एक पोलीस अंमलदार न्यायालयात भरण्यासाठी दिलेले 5 लाख रुपये घेवून 9 मार्च पासून गायब झाला आहे. त्याच्या शोधासाठी खानापूर जि.निर्मल येथील पोलीस पथक नांदेडला आले होते. वजिराबाद पोलीसांच्या मदतीने त्यांनी आपल्या गायब झालेल्या पोलीसाचा भरपूर शोध घेतला. परंतू वृत्तलिहिपर्यंत तरी तो पोलीस सापडला नव्हता.
तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्याच्या खानापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार जी.भिमेश्र्वर हा पोलीस अंमलदार बक्कल नंबर 3042 हा खानापूर येथे कोर्ट ड्युटी करत होता. दि.9 मार्च रोजी सकाळी त्याला 5 लाख रुपये न्यायालयात जमा करण्यासाठी देण्यात आले. पण तो न्यायालयातच गेला नाही.पोलीस ठाण्याच्या मागेच पोलीस वसाहतीत तो राहत होता. त्याची पत्नी जी.स्नेहलता भिमेश्र्वर यांनी दिलेल्या खबरीनुसार खानापूर पोलीसांनी जी.भिमेश्र्वर जी.राजन्ना हा पोलीस शिपाई (35) बेपत्ता झाल्याची नोंद क्रमांक 35/2023 नुसार 10 मार्च 2023 रोजी दाखल केली आहे.या नोंदीमध्ये जी.भिमेश्र्वर यांचे वय 35 वर्ष, उंची 6 फुट, बांधा सडपातळ, रंग गोरा, डोळे सर्वसाधारण गोलचेहरा, केसांचा रंग काळा, त्याने 9 तारेखेला परिधान केलेला पेहराव पांढऱ्यांचा गोल गळ्याचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट असे लिहिले आहे.
खानापूर जिल्हा निर्मल राज्य तेलंगणा येथील पोलीस पथक काल दि.11 मार्चच्या रात्री नांदेडला आले होते. कारण जी.भिमेश्र्वर याच्याकडे असलेला मोबाईल क्रमांकानुसार त्याचे लोकेशन नांदेड दाखवत होते. मिसिंग प्रकरणात रक्कम घेवून गेला याचा काही उल्लेख नाही. खानापूर पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, छायाचित्रात दिसणारा आणि नमुद टिपणीचा व्यक्ती कोणाला दिसला तर त्यांनी खानापूर पोलीस ठाण्यात याबद्दलची माहिती द्यावी. माहिती देण्यासाठी मोबाईल क्रमांक 8712659524 आणि 8712659523 असे क्रमांक सुध्दा दिले आहेत.
Post Views:
20