मुंबई | महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) भाजपचा कट्टर विरोधक मानला जात असला तरी नागालँडमध्ये मात्र राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी आणि जेडीयूनेही भाजप (Bjp) आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अटीशिवाय हा पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात जिंकलेल्या सर्व पक्षांचं सरकार येणार आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास आठवलेंनी शरद पवारांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. शरद पवार हे अनुभवी आणि मोठे नेते आहेत. त्यांनी नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करावं अशी माझी इच्छा आहे, असं आठवले म्हणालेत.
नागालँडमध्ये पवार साहेबांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी आता महाविकास आघाडीमधून बाहेर पडून मोदी साहेबांसोबत काम करावं, अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या-