मुश्रीफांच्या निवासस्थानी पुन्हा ईडीची छापेमारी

महत्वाच्या बातम्या


कागल : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत. सलग तिस-यांदा ईडीकडून ही छापेमारी सुरु आहे. पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी आहेत.

दरम्यान, हसन मुश्रीफांच्या घरासमोर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. मुश्रीफांच्या समर्थनार्थ सगळे कार्यकर्ते घराबाहेर जमा झाले आहेत. जनतेसाठी राबणा-या माणसाला त्रास दिला जात असल्याच्या भावना समर्थकांनी व्यक्त केल्या आहेत. मुश्रीफ घरात नसताना ईडीच्या अधिका-यांनी घरावर छापेमारी सुरु केली आहे. त्यामुळं कार्यकर्ते संतप्त झाले आहे.

कारखान्याच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ दोन महिन्यात तिस-यांदा ईडीच्या रडारवर आले आहेत. साखर कारखान्याशी संबंधित ईडीकडून कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले होते. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित ४० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

The post मुश्रीफांच्या निवासस्थानी पुन्हा ईडीची छापेमारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *