2 लाख देवून 10 लाख मागले; आत्महत्या – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-2 लाख रुपये देवून त्याचे 10 लाख रुपये मागून 10 लाख देता येत नाहीत तर शेताची सौदाचिठ्ठी करून द्या असे सांगण्याच्या त्रासाला कंटाळून झालेल्या आत्महत्ये प्रकरणी अंबाडा ता. हदगाव येथील एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवका चंद्रशेखर वानखेडे रा.कोथळा ता.हदगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.4 जुलैच्या सकाळी 10.30 वाजेच्यापुर्वी संभाजी वानखेडे यांच्या शेतातील झाडाला चंद्रशेखर वानखेडे यांनी फाशी लावून आत्महत्या केली. फिर्यादीप्रमाणे बजरंग भिमराव नरवाडे रा.अंबाडा ता.हदगाव यांच्याकडून शेतीच्या कामासाठी 2 लाख रुपये घेतले होते. त्याच्या बदल्यात 10 लाख रुपये द्या असे बजरंग नरवाडे सांगत होता. पैसे देता येत नसतील तर आपल्या शेताची सौदाचिठ्ठी करून द्या असे सांगून तो वारंवार चंद्रशेखर वानखेडेला त्रास देता होता आणि या त्रासाला कंटाळूनच चंद्रशेखर वानखेडेने आत्महत्या केली आहे. हदगाव पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 352, 351(2) (3) आणि 115(2) प्रमाणे गुन्हा क्रमांक 162/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक शेख असद हे करत आहेत.


Share this article:
Previous Post: 10 जुलै – राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिवस – VastavNEWSLive.com

July 9, 2024 - In Uncategorized

Next Post: जरांगे पाटील यांच्या रॅलीत पॉकीटमारांनी हात मारला ;13 लाख 88 हजारांची लुट; मरखेलजवळ घरफोडले

July 9, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.