माजी मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुतळ्याची पाहणी

Read Time:3 Minute, 50 Second

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात उभारण्यात येणाऱ्या माजी मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुतळ्याची कुत्रा समितीच्यावतीने पुणे येथे पाहणी करण्यात आली.

हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा नियोजित पुतळा शहरामध्ये बसविण्याचा निर्णय पालकमंत्री लोकनेते मा.ना.श्री.अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाने घेतला.

पुतळा निर्मितीची निविदा जागतिक स्तरावर प्रख्यात शिल्पकार सृष्टी आर्ट झोनला सुटली आहे. पुणे येथील कात्रज भागात ‘क्ले मॉडल’ची माझ्या नेतृत्वात पुतळा कृती समितीने शनिवारी पाहणी केली. आवश्यक त्या बदलाच्या सूचना देखील  देण्यात आल्या.

नांदेड शहराला सर्वांत सुंदर आणि महानगर बनविण्याचे अनुषंगाने पालकमंत्री मा.ना.श्री.अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आणि पुढाकारातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारून येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणा निर्माण करण्यात येत आहे.

त्याचाच एक प्रत्यय म्हणून हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात येणार आहे. नांदेड शहरात उभारण्यात येत असलेल्या पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात भर पडते आहे शिवाय वर्तमानातील आणि भविष्यातील पिढीलाही या पुतळ्यामुळे प्रेरणा मिळते आहे.

इतिहासाची उजळणी होते आहे. आता स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यामुळे शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात निश्चितपणे भर पडणार आहे. स्व.वसंतराव नाईक साहेब यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय झाला असून राज्यातील महाविकासआघाडी शासनाने देखील परवानगी दिली आहे.

स्व.वसंतराव नाईक साहेब यांचा नियोजित बसविण्यात येणारा पुतळा हा ब्रॉन्झ धातूमध्ये राहणार आहे. गुजरातच्या दृष्टी आर्ट झोन हा पुतळा तयार करणार आहे. या पुतळ्याचे ‘क्ले मॉडल’ पुण्याच्या कात्रज भागामध्ये ९ फुट उंच असणाऱ्या पुतळ्याची पाहणी शनिवार रोजी माझ्यावतीने करण्यात आली आहे.

याप्रसंगी महापौर प्रतिनिधी अॅड. निलेशरावजी पावडे यांच्यासह सदर पुतळा कृती समितीचे सदस्य जि.प. सभापती रामरावजी नाईक, नगरसेवक श्रीनिवास जाधव, प्रकाश राठोड, रोहिदास जाधव, स्वप्नील चव्हाण, विनोद चव्हाण यांच्यासह महापालिकेचे उद्यान अधिक्षक तथा सहाय्यक आयुक्त डॉ.फरतुल्ला बेग हे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

seventeen + 14 =